Pakistan Becomes Member Of UNSC : पाकिस्तान बनला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य !

पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत मुनीर अकरम

न्यूयॉर्क – पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपिठाचा वापर नेहमी भारताच्या विरोधात केला आहे. जम्मू-काश्मीरचा प्रश्‍न पाकिस्तानने अनेक वेळा उपस्थित केला आहे. आता पुन्हा ती संधी पाकिस्तानला मिळणार आहे. पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची २ वर्षांसाठी अस्थायी सदस्यता मिळाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तानचा हा आठवा कार्यकाळ आहे. भारतासाठी तणावाचा विषय म्हणजे जुलै महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची अध्यक्षता पाकिस्तान करणार आहे. यामुळे भारताच्या विरोधात प्रचार करण्यासाठी पाकिस्तान या व्यासपिठाचा वापर करणार आहे. पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत मुनीर अकरम यांनी म्हटले आहे की, जगासमोर काश्मीरचा प्रश्‍न मांडण्याचे त्यांचे काम चालूच रहाणार आहे.

संपादकीय भूमिका

कट्टरतावादी इस्लामी देश असलेल्या पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेवर प्रतिनिधित्व बहाल करणे म्हणजे आतंकवादाला प्रोत्साहन देण्यासारखेच आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही !