नंदुरबार – येथे १५ ते २२ जानेवारी या कालावधीत श्री श्री १०८ श्री महंत परमपूज्य तारादास बापू यांच्या नेतृत्वात, ‘श्रीराम सेवा समिती राजाराम मंदिर भक्तीधाम बद्रीझीरा’ आणि जय सियाराम भक्त परिवार’ यांकडून ‘श्रीराम विजय महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. येथील शहादा-प्रकाशा रस्त्यावरील कटारिया मॉल समोरील, श्रीरामनगर येथे हा कार्यक्रम होणार असून मोठ्या संख्येने सर्वांनी सहपरिवार कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन ‘श्रीराम सेवा समिती’ आणि ‘जय सियाराम भक्त परिवार’ यांच्याकडून करण्यात आले आहे. सदर महोत्सवात कलश नगर शोभायात्रा, महायज्ञ, संध्या भजन-कीर्तन, रामधून, सुंदरकांड पाठ, कवी संमेलन, संत संमेलन आणि प्रतिदिन महाप्रसाद-भंडारा आदी विविध कार्यक्रम होणार आहेत. २१ जानेवारी या दिवशी ९ ते ११ या कालावधीत परमपूज्य संत श्री तारादास बापू यांच्या सत्संगाचा लाभ घेण्याची अमूल्य संधी आहे, असे आयोजकांनी सांगितले आहे.