पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना नमन !
नवी देहली – २८ मे या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून नमन केले. या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आदी उपस्थित होते. या वेळी खासदारांनीही पुष्प वाहिले. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या आकाशवाणीवरील मासिक ‘मन की बात’ या कार्यक्रमातही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी सांगितले होते. ते म्हणाले की, वीर सावरकर यांचा त्याग, साहास आणि संकल्प शक्ती यांच्या गाथा आजही आम्हाला प्रेरित करत आहेत. त्यांचे व्यक्तीमत्व हे वीरता आणि विशालता यांनी भरलेले होते. त्यांच्या निर्भीड आणि स्वाभिमानी स्वभावाला गुलामीची मानसिकता पटत नव्हती.
सौजन्य टाईम्स नाऊ