ठाणे – देयकाची रक्कम संमत करण्यासाठी २ टक्के रकमेची मागणी करणार्या सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. विजय आव्हाड असे या कर्मचार्याचे नाव असून त्याला न्यायालयात उपस्थित केले असता पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी दिली. तक्रारदार यांचे मित्र कंत्राटदार असून त्यांनी तक्रारदाराला कामाचे सर्व अधिकार दिले होते. तक्रारदार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा ठेका घेऊन १० लाख रुपयांचे काम पूर्ण केले होते. या देयकाच्या रकमेवर विजय आव्हाड याने २५ सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली.
संपादकीय भूमिका :लाचखोरी नष्ट करण्यासाठी कठोर शिक्षा होण्याची आवश्यकता ! |