Mahakumbh 2025 : अटल आखाड्याच्या ३ सहस्र  साधू-संतांचा पेशवाईद्वारे कुंभक्षेत्री प्रवेश !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अटल आखाड्याच्या अनुमाने ३ सहस्र साधू-संतांनी एका भव्य पेशवाईद्वारे कुंभक्षेत्री प्रवेश केला. यात नागा साधू मोठ्या प्रमाणात होते. पेशवाईत सहभागी साधूंनी अंगाला भस्म लावले होते, तसेच त्यांनी शस्त्रास्त्रांद्वारे विविध युद्धकला प्रदर्शित केली. साधारण ५ कि.मी. चाललेल्या या पेशवाईसाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. या प्रसंगी अटल आखाड्याचे पीठाधीश्‍वर महामंडलेश्‍वर श्री श्री स्वामी विश्‍वात्मानंद सरस्वती महारा हे चांदीच्या रथावर आसनस्थ होते. ही पेशवाई पहाण्यासाठी भाविकांनी रस्त्यावर दुतर्फा गर्दी केली होती.

अटल आखाड्याच्या पेशवाईच्या स्‍वागताची काही छायाचित्रे :