रायगडावर १ आणि २ जूनला राज्‍यशासन ३५० वा शिवराज्‍याभिषेक सोहळा साजरा करणार !

भारतातील विविध राज्‍यांच्‍या राजधानीच्‍या ठिकाणी किंवा मराठा साम्राज्‍य, छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍याशी निगडित देशभरात २० अभ्‍यास केंद्रे निवडली जाणार आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी !

मुंबईकडून पुण्‍याच्‍या दिशेने १० कि.मी.पर्यंत रांगा लागल्‍या आहेत. खोपोलीपासून ते खंडाळ्‍यापर्यंत या रांगा लागल्‍या आहेत. एका चारचाकी गाडीला आग लागल्‍याने ती जळून खाक झाली आहे.

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाच्‍या सेवा संयुक्‍त पूर्वपरीक्षा सुरळीत !

परीक्षेद्वारे राज्‍यशासनाच्‍या विविध विभागांतील एकूण ८ सहस्र १६९ पदे भरली जाणार आहेत. आयोगामार्फत आतापर्यंतची ही सर्वांत मोठी भरती असून अर्ज सादर करणार्‍या उमेदवारांची संख्‍याही आयोगाच्‍या इतिहासातील सर्वोच्‍च संख्‍या आहे.

समलिंगी विवाह अयोग्य ! – सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी, पीठाधीश्वर, श्रीदत्त पद्मनाभपीठ, कुंडई

आज ज्या प्रकारे समाजात घडामोडी चालू आहेत, त्यातून आमचे संस्कार अल्प पडत आहेत, असे वाटते. संस्कारांची अधोगती होत असल्याचे हे लक्षण आहे. यासाठी लहान मुलांना आपल्या संस्कृतीचे धडे देऊन त्यांच्या मनावर चांगले संस्कार करणे आवश्यक !

बार्शी टाकळी (अकोला) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या पुतळ्‍याला विरोध करणार्‍या ९ धर्मांध नगरसेवकांचे निलंबन करा !

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्‍याच्‍या विषयावर विचारविनिमय होऊ नये, यासाठी काँग्रेस, राष्‍ट्रवादी काँग्रेससह वंचित आणि अपक्ष अशा ९ धर्मांध नगरसेवकांनी विरोध दर्शवला.

विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्‍या गोरक्षा विभागाकडून २५ गोवंशियांना जीवनदान !

वाहनातील गोवंशियांना दाटीवाटीने, क्रूरपणे कोंबून पशूवधगृहाकडे नेत असल्‍याचे निदर्शनास आले. या वेळी पोलिसांनी वाहन जप्‍त करून वाहनचालकावर गुन्‍हा नोंद केला.

गोव्यात गटविकास अधिकारी पदांसाठीच्या सूचीत आयआयटी पदवीधर, पीएच्.डी.धारक आदींचा समावेश

गोवा सार्वजनिक सेवा आयोगाने मागील वर्षी नोव्हेंबर मासात गोवा सरकारच्या ‘पर्सनल डिपार्टमेंट’मध्ये १० गटविकास अधिकारी पदांसाठी विज्ञापन दिले होते. त्यानंतर या पदांसाठी एकूण ४ सहस्र अर्ज आले होते.

अत्‍यंत अस्‍वच्‍छता, मोकाट जनावरे, इमारतीची दुरवस्‍था यांसह अनेक समस्‍या असलेले अक्‍कलकोट बसस्‍थानक !

‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. या वृत्तमालिकेच्या माध्यमातून एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी चळवळ उभी रहावी, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.

कार्यालयीन वेळेत योग प्रशिक्षण घेणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांसह ८ जणांवर दंडात्मक कारवाई !

कार्यालयीन वेळेत योग प्रशिक्षण घेणार्‍या महापालिकेच्या वाय.सी.एम्. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांसह ८ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्या वेतनातून दंडाची रक्कम वसूल करण्याचा आदेश प्रशासक शेखर सिंह यांनी दिला.

नवी मुंबईत पाणी कपातीला प्रारंभ

या वर्षी पाऊस विलंबाने येणार असल्याने राज्य शासनाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात २८ एप्रिलपासून पाणीकपात लागू करण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली.