|
मुंबई – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आणि जुन्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. सुट्ट्यांमुळे अनेकजण फिरण्यासाठी बाहेर जात असल्याने वाहनांची पुष्कळ गर्दी झाली होती. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने १० कि.मी.पर्यंत रांगा लागल्या आहेत. खोपोलीपासून ते खंडाळ्यापर्यंत या रांगा लागल्या आहेत. एका चारचाकी गाडीला आग लागल्याने ती जळून खाक झाली आहे.
वाहतूक पोलीस घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यातच महामार्गावर ७० वाहने बंद पडल्याने प्रवासी त्रस्त झाले. काही वाहनांचे इंजिन अधिक गरम झाले होते. ‘क्लच प्लेट’ तापून वाहने बंद पडली. अशी वाहने बाजूला थांबवण्यात आली.