मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या भरती प्रक्रियेतील महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’, गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा सुरळीत पार पडली, असे लोकसेवा आयोगाने म्हटले आहे.
या परीक्षेसाठी एकूण ४ लाख ६७ सहस्र ८५ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. त्यांच्या बैठक व्यवस्थेसाठी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवरील एकूण १ सहस्र ४७५ परीक्षा उपकेंद्रे निश्चित करण्यात आली होती. या पूर्वपरीक्षेसाठी साधारणपणे ८० टक्के उपस्थिती होती. परीक्षेद्वारे राज्यशासनाच्या विविध विभागांतील एकूण ८ सहस्र १६९ पदे भरली जाणार आहेत. आयोगामार्फत आतापर्यंतची ही सर्वांत मोठी भरती असून अर्ज सादर करणार्या उमेदवारांची संख्याही आयोगाच्या इतिहासातील सर्वोच्च संख्या आहे.