कार्यालयीन वेळेत योग प्रशिक्षण घेणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांसह ८ जणांवर दंडात्मक कारवाई !

पिंपरी (पुणे) – कार्यालयीन वेळेत योग प्रशिक्षण घेणार्‍या महापालिकेच्या वाय.सी.एम्. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांसह ८ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्या वेतनातून दंडाची रक्कम वसूल करण्याचा आदेश प्रशासक शेखर सिंह यांनी दिला. या व्यतिरिक्त विनाअनुमती योग प्रशिक्षणाला उपस्थित रहाणार्‍या ३ परिचारिकांना प्रत्येकी २०० रुपये दंड आकारला आहे. याची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात केली जाणार आहे.