रस्ते काँक्रिटीकरणाचे ६ कोटी रुपये खर्चाचे काम चालू; एका वर्षात तुर्भेगाव खड्डामुक्त होणार ! – रामचंद्र घरत, जिल्हाध्यक्ष, भाजप

तुर्भे गावातील सर्व रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यातील कामाला प्रारंभ झाला आहे. या रस्ते काँक्रिटीकरणामुळे एका वर्षात तुर्भेगाव खड्डामुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

‘महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थे’मुळे महिलांचे सबलीकरण ! – दत्ताजी थोरात

महर्षि धोंडो केशव कर्वे यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यामुळे अनेक अबला महिला सबला झाल्या आहेत. त्यामुळे त्या आज विविध क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेत आहेत, असे प्रतिपादन ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थे’चे शाळा समिती अध्यक्ष दत्ताजी थोरात यांनी व्यक्त केले.

आत्‍मनिर्भर आणि स्‍वावलंबी भारतासाठी ‘सहकार भारती’ने पुढाकार घ्‍यावा ! – प.पू. काडसिद्धेश्‍वर स्‍वामी

राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ विविध क्षेत्रांत अनेक संस्‍था, संघटना यांच्‍या माध्‍यमातून सामाजिक कार्य करत आहे. सहकार क्षेत्रात सहकार भारती संपूर्ण भारतात काम करत आहे. काही मूठभर लोकांमुळे सहकार चळवळ अपकीर्त झाली.

हिंदु राष्ट्रातील कायद्यांच्या पालनाने जनतेची साधनाही होईल !

‘हिंदु राष्ट्रातील सर्व कायदे धर्माधिष्ठित असतील. त्यामुळे त्यांच्यात पालट करावा लागणार नाही आणि त्यांच्या पालनाने गुन्हे न होता साधनाही होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

 एरव्‍ही ‘ब्रेकिंग न्‍यूज’चा सपाटा लावणार्‍या प्रसारमाध्‍यमांना केरळमधील हिंदु तरुणींचे वास्‍तव लक्षात कसे आले नाही ?

‘द केरल स्‍टोरी’ चित्रपट पहाणार्‍या प्रत्‍येक धर्मप्रेमीने केरळमधील हे अराजक थांबवण्‍यासाठी संघटित व्‍हावे. ‘जे आजवर घडले, ते यापुढे घडू द्यायचे नाही’, असा निश्‍चय प्रत्‍येक हिंदूने करावा.

‘बेस्‍ट’ निर्णय !

फक्‍त ‘बेस्‍ट’च नाही, तर शासनाचे सर्व उपक्रम आणि कार्यालये यांमध्‍ये ‘भ्रमणभाष’ वापराच्‍या संबंधित नियमावली लागू करणे आवश्‍यक झाले आहे. यामधून सर्वांचा अमूल्‍य वेळ तर वाचेल आणि स्‍वयंशिस्‍तही लागेल.

‘मिरज विद्यार्थी संघा’च्या वसंत व्याख्यानमालेस २ मेपासून प्रारंभ !

मिरज विद्यार्थी संघाच्या ९८ व्या वसंत व्याख्यानमालेस २ मेपासून प्रारंभ होत आहे. १५ मे पर्यंत चालणार्‍या या व्याख्यानमालेचे उद्घाटन २ मे या दिवशी सायंकाळी ६.४५ वाजता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते होणार आहे.