गोवा सरकार मराठी भाषेला शासकीय व्यवहारामध्ये डावलत असल्याचा आरोप

सर्व शासकीय व्यवहारात कोकणीबरोबर मराठीचा वापर करून कायद्याचा मान राखावा आणि मराठीला डावलून लोकांचा रोष ओढवून घेऊ नये – मराठी राजभाषा समिती

सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यात २ अल्पवयीन मुलींवर अत्याचार, तिघांना पोलीस कोठडी

पहिल्या प्रकरणात पोलिसांनी अमित जंगले याला अटक केली आहे. दुसर्‍या प्रकरणात पीडित मुलगी गर्भवती असल्याचे समजल्यानंतर तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी सडेकर-नाईक आणि चोर्लेकर यांना अटक केली.

मिरज येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव यात्रा !

गौरव यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट दर्शवणारा चित्ररथ, २ अश्व, ‘मी सावरकर’, अशा लिहिलेल्या भगव्या टोप्या परिधान केलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही स्वतंत्र नगर परिषद करण्याचा अध्यादेश !

पुढील ३० दिवसांमध्ये यावर नागरिकांच्या हरकती/ सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी त्या नगरविकास विभागाकडे पाठवतील आणि अंतिम अध्यादेशाद्वारे नवी नगर परिषद स्थापन केली जाईल.

कात्रज (पुणे) परिसरामध्ये धोकादायक इमारतीमध्ये भरतेय शाळा !

वर्ष २०१८-१९ मध्ये ही इमारत ‘धोकादायक’ म्हणून अहवाल जिल्हा परिषद, पंचायत समितीला देण्यात आला आहे; परंतु त्याच ‘धोकादायक’ इमारतीमध्ये शाळा भरत असून विद्यार्थी भीतीच्या छायेतच शिक्षण घेत आहेत

गोवा : मोतीडोंगरावरील झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्याच्या निर्णयावर कोमुनिदाद संस्थेची अप्रसन्नता !

कोमुनिदाद संस्थेसह सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी या झोपडपट्टीच्या पुनर्वसनाला विरोध करायला हवा; कारण या ठिकाणी बांगलादेशी घुसखोर आणि धर्मांध मुसलमान यांचे वास्तव्य आहे. काही वर्षांपूर्वी या ठिकाणी ट्रकमध्ये तलवारी आढळल्या होत्या.

सरकार ‘गोवा देवस्थान नियमन कायद्या’त सुधारणा करणार

महाराष्ट्रात आहे तशी परिस्थिती गोव्यात होऊ नये, यासाठी देवस्थान समित्यांनी मंदिरे शासनाच्या कह्यात जाणार नाहीत, हे पहाणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे देवस्थान समित्यांवर भक्तांची नेमणूक करून घोटाळे होणार नाहीत, असे पहाणे आवश्यक आहे.

अमेरिकेतील अभिनेत्रीचे चुंबन घेतल्याप्रकरणी अभिनेता वरुण धवन याच्यावर टीका !

नीतीमत्तेशी दुरान्वयाने संबंध नसलेल्या आणि असे कृत्य करून भारताची मान खाली घालायला लावणार्‍या अशा कलाकारांच्या चित्रपटांवर जनतेने बहिष्कार घातल्यास आश्चर्य वाटू नये !

ठाणे येथे पोलीस भरतीच्या परीक्षेत अपप्रकार करणार्‍या परीक्षार्थीला अटक

अशांना कठोर शिक्षा केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! असे नकली परीक्षार्थी बसवून उत्तीर्ण होणारे पोलीस काय कामाचे ?

४५ सापळे रचून ७० हून अधिक लाचखोर संशयित कह्यात !

केवळ ३ मासांत केलेली ही कारवाई पहाता भ्रष्टाचारी वृत्ती किती मुरलेली आहे, याची कल्पना येते !