४५ सापळे रचून ७० हून अधिक लाचखोर संशयित कह्यात !

नाशिकमध्ये ३ मासांतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई !

(प्रतिकात्मक छायायाचित्र )

नाशिक – गेल्या ३ मासांत नाशिक विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडाकेबाज कारवाई करत ४५ सापळे रचत ७० हून अधिक संशयितांना कह्यात घेतले आहे. मृत्यूचा दाखला मिळवणे, सातबारा मिळवणे, कामाचा मोबदला मिळवून देणे अशा कारणांसाठी लाच घेतली जाते. यात अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी अडकले आहेत. अगदी २०० रुपयांपासून ३० लाख रुपये, तसेच कोट्यवधींच्या रकमेची लाच घेतांना संबंधितांना कह्यात घेण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

केवळ ३ मासांत केलेली ही कारवाई पहाता भ्रष्टाचारी वृत्ती किती मुरलेली आहे, याची कल्पना येते !