चित्रपट दिग्‍दर्शक राजकुमार संतोषी यांची मुंबई पोलिसांकडे अतिरिक्‍त सुरक्षेची मागणी !

संतोषी यांचा ‘गांधी-गोडसे : एक युद्ध’ २६ जानेवारी या दिवशी प्रसारित होणार आहे. या चित्रपटाचे प्रसारण रहित करा, अन्‍यथा परिणाम वाईट होईल, अशी धमकी मिळाल्‍याचे राजकुमार संतोषी यांनी पत्रात म्‍हटले आहे.

आय.एन्.एस्. वागीर’ पाणबुडी नौदलाच्‍या सेवेत रुजू !

पाण्‍याखालील लक्ष्याचा भेद करण्‍यासाठी पाणतीर, तर पाण्‍यावरील किंवा भूमीवरील लक्ष्याला भेदण्‍यासाठी क्षेपणास्‍त्र डागण्‍याची क्षमता या पाणबुडीत आहे.

नागपूर शहरात अस्‍वच्‍छता पसरवणार्‍यांकडून ४ मासांत १२ लाखांचा दंड वसूल !

स्‍वातंत्र्याच्‍या ७५ वर्षांनंतरही उपराजधानीसारखी शहरे अस्‍वच्‍छ असणे हा जनतेला प्रशासनाने शिस्‍त न लावल्‍याचा परिणाम !

‘सुदर्शन न्‍यूज’चे संपादक सुरेश चव्‍हाणके यांनी हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांसह रायरेश्‍वरावर घेतली हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेची शपथ !

हिंदु धर्मावर होणारे विविध आघात यांपासून धर्माचे रक्षण व्‍हावे आणि पुन्‍हा एकदा हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करण्‍यास कटीबद्ध होण्‍यासाठी भोर तालुक्‍यातील रायरेश्‍वर येथे या शपथ ग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते.

आटपाडी (जिल्‍हा सांगली) येथे धर्मांतर घडवणार्‍या गुन्‍हेगाराला पाठीशी घालण्‍यासाठी ख्रिस्‍ती समाजाचा मोर्चा ! – नितीन शिंदे, माजी आमदार

सांगलीतील शांतीनगर येथे हिंदु मातंग समाजाची फसवणूक करून धर्मांतर करण्‍यात आले आहे. सध्‍या महाराष्‍ट्रात धर्मांतरबंदी कायदा करण्‍यात यावा, यासाठी प्रत्‍येक शहरामध्‍ये हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनेचे भव्‍य मोर्चे निघत असल्‍यामुळे धर्मांतरबंदी कायदा झाल्‍यास या तथाकथित नेत्‍यांची दुकानदारी बंद पडेल.

सातारा येथे कोयता गँगची दहशत

शहरातील सयाजीराव हायस्‍कूलसमोर कोयता गँगमधील काही गुंडांनी हातात कोयते नाचवत गोंधळ घातला. हाकेच्‍या अंतरावर असणार्‍या शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्‍थळी धाव घेत २ जणांना कह्यात घेतले.

पुणे येथे ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही ! – बजरंग दल

शाहरूख खानचा वादाच्‍या भोवर्‍यात अडकलेला ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला देशभरात प्रदर्शित होणार आहे; परंतु हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनेने हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्‍याची चेतावणी दिली आहे.

नागपूर येथील प्रादेशिक परिवहन अधिकार्‍याकडून सहकारी महिला अधिकार्‍याचा लैंगिक छळ !

विभागातील महिला अधिकार्‍यांशी वरिष्‍ठ अधिकार्‍याने असे वागणे, हे अनैतिकतेची परिसीमा गाठण्‍यासारखेच आहे. अशांचे केवळ स्‍थानांतर न करता त्‍यांना बडतर्फ करून त्‍यांच्‍यावर फौजदारी गुन्‍हा नोंद केला पाहिजे.