केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कर्नाटक सरकारकडे मागितले स्पष्टीकरण ! – देविदास पांगम, महाधिवक्ता

‘‘केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कर्नाटक सरकारकडून स्पष्टीकरण मागणे, ही गोव्याच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक सरकारने यापूर्वी पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात धरण प्रकल्प उभारणार नसल्याचे आश्वासन सर्वाेच्च न्यायालयाला दिलेले आहे.’’

राजापूर (जिल्‍हा रत्नागिरी) येथील सनातनचे ७८ वे संत पू. चंद्रसेन मयेकर (वय ८६ वर्षे) यांचा देहत्‍याग !

सनातनचे ७८ वे संत पू. चंद्रसेन मयेकर (वय ८६ वर्षे) यांनी २५ जानेवारी (श्री गणेश जयंती) या दिवशी दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी रहात्‍या घरी देहत्‍याग केला. ते गेले काही मास रुग्‍णाईत होते. पू. मयेकरकाका सेवानिवृत्त ग्रामसेवक होते. सेवानिवृत्तीनंतर वर्ष १९९९ पासून सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार ते साधना करत होते.

लोकप्रतिनिधींचे आवाज काढून पोलिसांना फसवणारा तोतया पोलिसांच्‍या कह्यात !

अशी फसवणूक करणार्‍यांना वेळीच कठोर शिक्षा न दिल्‍याचा परिणाम ! लोकप्रतिनिधी आणि पोलीस यांच्‍या नावे फसवणार्‍यांना पोलिसांचे भय नसल्‍याचे द्योतक !

गोवा : कवळे येथील श्री शांतादुर्गा देवस्थानच्या जत्रोत्सवानिमित्त नौकाविहार

श्री शांतादुर्गादेवीचा जत्रोत्सव २२ जानेवारी ते २९ जानेवारी २०२३ या कालावधीत उत्साहात साजरा होत आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांचा गोमंतकियांना संदेश

ज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार उपभोगतांना प्रत्येक नागरिकाने राज्यघटनेशी निगडित तत्त्वे अबाधित रहाण्यासाठी मूलभूत कर्तव्यांचेही पालन केले पाहिजे.

झाशीची राणी लक्ष्मीबाई !

झाशीच्‍या राणीने युद्ध करत असतांना पोटच्‍या मुलाला पाठीवर घेतले होते. ‘युद्धात हरत आहे’, हे तिच्‍या लक्षात आल्‍यावर ‘आपले शरीर शत्रूच्‍या हाती लागू नये’; म्‍हणून तिने घोड्यासहित गडावरून उडी घेतली.

कुडाळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वाहनफेरीला हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फेरीच्या प्रारंभी पिंगुळी तिठा येथील श्री सिद्धविनायक मंदिरात वाहनफेरी आणि राष्ट्र-जागृती सभा यांच्या यशस्वीतेसाठी सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते श्रीफळ ठेवून गार्‍हाणे घालण्यात आले.

कर्नाटक शासनाच्या विरोधात अवमान याचिका प्रविष्ट करण्याचा ‘म्हादई बचाव अभियान’चा विचार

कर्नाटक सरकारने एक दगड हालवला किंवा झाड कापले, तरी आम्ही वर्ष २०१७ च्या सर्वाेच्च न्यायालयाच्या निवाड्याचा अवमान केल्यावरून न्यायालयात जाणार आहोत.

मळेवाड येथे गडाचे नाव असलेल्या ‘रिसॉर्ट’मध्ये बीअर बारसाठी अनुमती मागितली !

रिसॉर्टमध्ये बीअर बारला अनुमती दिल्यास ती छत्रपती शिवाजी महारांच्या विचारांची पायमल्ली ठरेल आणि प्रसंगी महाराष्ट्र पेटून उठण्यास वेळ लागणार नाही.

ध्वनीप्रदूषणावरून सनबर्नच्या विरोधात फौजदारी स्वरूपाची कारवाई ! – प्रदूषण नियंत्रण मंडळाने न्यायालयाला दिली माहिती

न्यायालयाने फैलावर घेतल्यावर कारवाई करणारे निष्क्रीय वृत्तीचे नव्हे, तर स्वतःहून प्रदूषणाच्या विरोधात कारवाई करणारे तत्त्वनिष्ठ अधिकारी असलेले प्रदूषण नियंत्रण मंडळ हवे !