पुणे येथे ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही ! – बजरंग दल

पुणे येथे ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही ! – बजरंग दल

पुणे – शाहरूख खानचा वादाच्‍या भोवर्‍यात अडकलेला ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला देशभरात प्रदर्शित होणार आहे; परंतु हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनेने हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्‍याची चेतावणी दिली आहे. त्‍याचे पडसाद आता पुण्‍यातही उमटले आहेत. शहरातील राहुल टॉकीज येथे लावण्‍यात आलेले पठाण चित्रपटाचे पोस्‍टर बजरंग दलाकडून काढण्‍यात आले आहेत.

पुणे शहरात कुठेही पठाण चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी चेतावणी बजरंग दलाच्‍या कार्यकर्त्‍यांनी दिली आहे, तसेच कुठेही अशा प्रकारचे पोस्‍टर लावल्‍यास ते बजरंग दलाकडून काढण्‍यात येतील, असे कार्यकर्त्‍यांनी सांगितले आहे.