सातारा, २४ जानेवारी (वार्ता.) – पुणे शहरातील कोयता गँगची दहशत मोडीत काढत पुणे पोलिसांनी ‘कोयता गँग’च्या काही जणांना अटक केली. त्यामुळे कोयता गँगने आता सातारा शहरात दहशत माजवण्यास प्रारंभ केला आहे. शहरातील शिवतीर्थ (पोवई नाका) परिसरात कोयता गँगमधील काही गुंडांनी कोयते नाचवल्यामुळे शहरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
शहरातील सयाजीराव हायस्कूलसमोर कोयता गँगमधील काही गुंडांनी हातात कोयते नाचवत गोंधळ घातला. हाकेच्या अंतरावर असणार्या शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत २ जणांना कह्यात घेतले. ३ जणांचा पाठलाग करून त्यांना अटक केली.