साधना केल्यानेच निरंतर आनंदाची प्राप्ती होते ! – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

पू. (अधिवक्ता) कुलकर्णी म्हणाले, ‘‘सनातनचा आश्रम ही पवित्र भूमी आहे. स्वतःतील स्वभावदोष घालवून अनेक जण संतपदापर्यंत पोचले आहेत. शिबिराचे ३ दिवस आश्रामतील चैतन्य ग्रहण करून साधना करूया.’’

नवी मुंबईकरांचा मालमत्ताकर माफीचा ठराव लवकर संमत करावा !

गणेश नाईक यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नगरविकास विभागावरील पुरवणी मागण्यांच्या संदर्भात चर्चा करतांना नवी मुंबईकरांना मालमत्ता करमाफी देण्याची आग्रही मागणी केली.

लव्ह जिहाद येथेही ?

अल्पवयीन कलाकार मालिका, चित्रपट यांमधून जीवनाचे मर्म जाणल्याप्रमाणे किंवा तत्त्वज्ञाप्रमाणे संवादफेक करतात; मात्र जीवनात छोट्या-मोठ्या समस्यांपुढे हतबल होऊन थेट जीवनयात्राच संपवतात. तेव्हा ‘हेच का ते कलाकार ?’, असा प्रश्न पडतो. लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यासह मुलींना धर्मशिक्षित करणेही आवश्यक !

पाद्री किंवा मौलवी यांना अशा धमक्या मिळत नाहीत !

‘ओवैसी आणि मुसलमान यांच्या विरुद्ध बोलल्यास तुम्हाला बाँबने उडवून देऊ’, अशी धमकी प्रसिद्ध कथाकार देवकीनंदन ठाकूर महाराज यांना मिळाली आहे. ‘दिनेश’ असे नाव सांगून दुबई येथून ही धमकी देण्यात आली.

व्यायाम हे ‘उरकण्याचे काम’ नसून ते ‘आवडीने करण्याचे नित्यकर्म’ व्हायला हवे !

‘व्यायाम करत असतांना स्वतःच्या शरिराची कार्यक्षमता आधीच्या तुलनेत वाढत आहे ना’, याकडे ठराविक कालावधीने लक्ष द्यायला हवे.

डायवर्जन्स सर्टिफिकेट !

‘डायवर्जन्स सर्टिफिकेट’, म्हणजे तुमचे सरकारी कागपदपत्रांमधील नावामध्ये पालट करावयाचा असेल, तर त्यासाठी सरकारी प्रमाणपत्र दिले जाते. त्यात तुम्हाला अपेक्षित असलेल्या नावात सुधारणा करून मिळते. ‘डायवर्जन्स सर्टिफिकेट’ हे महसूल विभागाच्या अंतर्गत येते.

‘सनबर्न’ नव्हे, तर ‘संस्कृतीबर्न’ फेस्टिव्हल !

देशाची भावी पिढीच व्यसनाच्या आहारी जात असेल, तर भारताला महाशक्ती करण्याचे उद्दिष्ट कधीतरी साध्य होऊ शकते का ? याचा गांभीर्याने विचार या निमित्ताने होणे आवश्यक आहे, तसेच युवकांनीही क्षणिक मोहापायी, नशेच्या आहारी जाऊन अशा निरर्थक महोत्सवांमध्ये आपला अमूल्य वेळ वाया घालवू नये.

‘बडगा’ रशियासाठी, झळ जगाला !

रशिया हा जगातील प्रमुख तेल पुरवठादार देश असून त्याच्या अर्थव्यवस्थेसाठी तेल आणि वायू निर्यातीतून मिळणारे उत्पन्न हा प्रमुख आधार आहे. ‘प्राईस कॅपिंग’ घालून या देशाला आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणण्याचा अमेरिकेचा उद्देश आहे; पण उलट त्याची झळ अन्य जगाला बसण्याची शक्यता आहे.

विविध टाकाऊ वस्तूंचा लागवडीसाठी कुंडीप्रमाणे वापर करावा !

सध्या पेठेमध्ये सर्वच प्रकारच्या कुंड्या, ग्रो-बॅग (लागवडीसाठीच्या पिशव्या) यांचे मूल्य अधिक आहे. ‘हा व्यय अल्प प्रमाणात व्हावा’, यासाठी विविध टाकाऊ वस्तूंचा कुंड्यांप्रमाणे वापर करता येतो.

प्रभु श्रीरामचंद्र आणि बिभीषण यांची प्रथम भेट

पौष शुक्ल चतुर्थी या तिथीला प्रभु श्रीरामचंद्र आणि बिभीषण यांची भेट झाली. त्या निमित्ताने…