नवी मुंबईकरांचा मालमत्ताकर माफीचा ठराव लवकर संमत करावा !

आमदार गणेश नाईक यांची विधानसभेत मागणी

आमदार गणेश नाईक

नवी मुंबई, २५ डिसेंबर (वार्ता.) – शहरातील निवासी मालमत्तांना मालमत्ताकर माफ करण्याचा प्रस्ताव राज्यशासनाने लवकर संमत करावा, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी विधानसभेत केली. गणेश नाईक यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नगरविकास विभागावरील पुरवणी मागण्यांच्या संदर्भात चर्चा करतांना नवी मुंबईकरांना मालमत्ता करमाफी देण्याची आग्रही मागणी केली. त्यासह प्रकल्पग्रस्तांची आवश्यक ती बांधकामे नियमित करतांना एकच दर आकारण्याची मागणी केली.

महापालिकेने १ जानेवारी २०२२ या दिवशी यासंबंधीचा ठराव केल्यावर हा ठराव २७ मे २०२२ या दिवशी राज्यशासनाने संमत केला; मात्र प्रस्ताव अद्याप संमत न केल्याने नाईक यांनी अप्रसन्नता व्यक्त केली, तसेच ‘लवकरात लवकर हा प्रस्ताव संमत करून नवी मुंबईकरांना दिलासा द्यावा’, अशी मागणी सभागृहात केली.