पंचमहाभूतांमधील असंतुलन : कलियुगातून सत्ययुगाकडे वाटचाल !
सनातन धर्मग्रंथांनुसार युगपरिवर्तन हे केवळ एका कालखंडाचा अंत नाही, तर एक व्यापक नैसर्गिक, आध्यात्मिक आणि वैश्विक घटना असते. जेव्हा एका युगातून दुसर्या युगात संक्रमण होते, तेव्हा हे परिवर्तन संपूर्ण ब्रह्मांडात स्पष्टपणे अनुभवले जाते.