धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रचारकांना युवकांनी पिटाळले !

ख्रिस्ती मिशनरी लोकांना धर्म परिवर्तनासाठी प्रवृत्त करत होते. याला स्थानिक आदिवासी युवकांनी विरोध केला, अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजा केणी यांनी दिली .

जयंत पाटील यांच्यावरील कारवाई मागे न घेतल्याने विधानसभेतून विरोधकांचा सभात्याग !

जयंत पाटील यांनी अध्यक्षांविषयी अवमानकारक वक्तव्य केले होते. स्वत:च्या नेत्यांच्या चुकीच्या वर्तनासाठी सभात्याग करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी विरोधकांनी वेळ देणे अपेक्षित आहे !

कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश करा ! – उद्धव ठाकरे

सीमावादाच्या सूत्राविषयी सर्वोच्च न्यायालयाचा जोपर्यंत निकाल येत नाही, तोपर्यंत सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा. सर्व पक्षांनी मराठी बांधवांच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विधानसभेत लक्षवेधी सूचनांचा ५५ मिनिटांचा वेळ वाया !

सभागृहाच्या सकाळच्या सत्रात एकूण १३ लक्षवेधी सूचना चर्चेसाठी घेण्यात आल्या होत्या; परंतु मंत्री उपलब्ध नसल्यामुळे केवळ ५ लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली. 

मुक्ताईनगर (जळगाव) येथील गौण खनिज उत्खनानात ४०० कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप

एकनाथ खडसे यांनी भाजपच्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्याची सार्वजनिकरित्या वाच्यता केली होती मात्र मुरुम उत्खननाच्या प्रकरणात एकनाथ खडसे हेच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत राज्यात नवीन धोरण घोषित करणार ! – राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री

राज्यात नदी, वाळू, खाणी यांतील वाळूचे अवैध उत्खनन चालू आहे. याला आळा घालण्यासाठी नवीन धोरणामध्ये सामान्य नागरिकांनाही वाळू उत्खननाचा परमिट परवाना सरकारकडून मिळेल.

संतांचे महत्त्व !

‘डॉक्टर फारतर व्याधी कमी करतात; पण मृत्यू टाळू शकत नाहीत. याउलट संत जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतूनच मुक्त करतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आज ‘वीर बालक दिवसा’निमित्तच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी होणार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिखांचे १० वे गुरु श्री गुरु गोविंद सिंह यांच्या ‘प्रकाश पर्व’ दिनानिमित्त त्यांचे पुत्र बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या हौतात्म्यावरून आजचा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.

संपूर्ण देशासाठी लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा करा ! – कार्तिक साळुंके, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देहली येथील जंतरमंतरवर हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन