लव्ह जिहाद येथेही ?

अभिनेत्री तुनिषा शर्मा व सहकलाकार शिझान खान

अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने २४ डिसेंबरला नायगाव येथे वाहिनीच्या चित्रीकरण ‘सेट’वरील खोलीत आत्महत्या केली. तिचे वय केवळ २० वर्षे होते. तिने वयाच्या १४ व्या वर्षी मालिकांमध्ये काम करण्यास प्रारंभ केला आणि तिला अल्पावधीतच पुष्कळ प्रसिद्धी मिळाली. ‘सोनी सब’ वाहिनीवरील ‘अलिबाबा : दास्तान ए काबुल’ या मालिकेतील शिझान खान या सहकलाकाराच्या समवेत तिचे प्रेमसंबंध होते. तुनिषाच्या आईने शिझान खान याला त्यांच्या मुलीच्या आत्महत्येसाठी उत्तरदायी ठरवले आहे. ‘शिझानला कंटाळून माझ्या मुलीने आत्महत्या केली’, असा त्यांचा दावा आहे. तुनिषा हिच्या परिचित महिला कलाकाराने ‘शिझान याने लग्नाला नकार दिला. त्यामुळे त्यांच्यातील संबंध संपुष्टात आले होते. यामुळे ती प्रचंड नैराश्यात होती’, असे सांगितले, म्हणजे येथेही लव्ह जिहादचे कारण असल्याचे प्राथमिकदृष्ट्या समजते. तुनिषा हिच्या आईला त्यांच्यातील प्रेमसंबंधांची माहिती होती आणि त्यांनीही मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला होता, हेसुद्धा लक्षात येते; मात्र त्याही एका मर्यादेच्या पलीकडे काही करू शकलेल्या नाहीत. शिझान याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या चौकशीतून अन्य माहिती बाहेर येईलच; मात्र येथे वयात येणार्‍या हिंदु तरुणींसमवेत धर्मांध ज्या क्लृप्त्या वापरतात, तेच येथे दिसते. मुलींना प्रेमाच्या पाशात ओढायचे, त्यांचा उपभोग घ्यायचा आणि मग सोडून द्यायचे. बिचार्‍या हिंदु तरुणींनी प्रेमासाठी, धर्मांधांमध्ये त्यांचा भावी जोडीदार पाहून सर्वस्व दिलेले असते आणि धर्मांध तरुण स्वतःचा मूळ रंग जेव्हा दाखवतो, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसल्याविना रहात नाही.

काही दिवसांपूर्वी उघड झालेल्या वसईतील श्रद्धा वालकर हिच्या क्रूर आणि नृशंस हत्येच्या प्रकरणी हेच दिसते. आफताब पूनावाला याने श्रद्धाला प्रेमात पाडले. तिचे शोषण केले आणि तिने लग्नाविषयी विचारल्यावर त्याला तिच्यात काहीच रस उरला नसल्याने तिला नकार दिला. लग्नाचा तगादा लावल्यावर मात्र तिची क्रूर हत्या केली. एवढ्यावरच न थांबता आफताब पूनावाला याने राक्षसी पद्धतीने श्रद्धाचे ३५ तुकडे करून थंड डोक्याने ते शीतकपाटामध्ये (फ्रीजमध्ये) ठेवून नंतर जंगलात फेकले. याही पुढे जाऊन त्याने अन्य हिंदु मुलींना बोलावून त्यांच्यावर प्रेम असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हेच सिद्ध होते की, ‘लव्ह जिहाद’ केवळ चर्चेचा कपोलकल्पित विषय नसून त्याचे दृश्य परिणाम समाजात उघड्या डोळ्यांनी दिसू लागले आहेत. तेव्हा देशातील हिंदु युवती आणि त्यांचे पालक यांनीही सजग होऊन या विषयाकडे गांभीर्याने पहायला हवे. श्रद्धाच्या वडिलांनी सांगितले की, मुलींचे सज्ञान असण्याचे कायदेशीर वय १८ वर्षे न ठेवता ते वाढवावे आणि धर्मजागृती करावी. ते एका अर्थाने योग्यही वाटते; कारण १८ वर्षे पूर्ण झालेली हिंदु मुलगी तिच्यावरील धर्मांधाच्या प्रभावामुळे कुटुंबाचे न ऐकता उलट कुटुंबाशीच शत्रुत्व पत्करते आणि शेवटी मृत्यूला कवटाळते. धर्मजागृती करण्याचे सूत्रही आवश्यक असेच आहे. हिंदु मुलींना धर्मांधांचे खरे स्वरूप, त्यांचे षड्यंत्र यांविषयी ठाऊक नसल्याने आणि त्यांना धर्मशिक्षणही नसल्याने त्या धर्मांधांच्या जाळ्यात सहज अडकतात.

चित्रपट आणि मालिका जिहाद !

चित्रपटांमध्ये आमीर खान, शाहरूख खान आणि सलमान खान यांच्या समवेत काम करणार्‍या सर्व अभिनेत्री या हिंदूच निवडल्या गेल्या आहेत. शाहरूख खान यांच्या चित्रपटात बहुतांश वेळा दोन हिंदु अभिनेत्रींचे पात्र दाखवले गेले आहे. ‘पूर्वी प्रेम करणारी एक हिंदु तरुणी शाहरूख खान याच्या जीवनात दुसरी हिंदु तरुणी आल्यावर पहिली तरुणी स्वखुषीने माघार घेऊन स्वत:च्या प्रेमाचे बलीदान देण्यास सिद्ध होते’, असे दाखवले गेले. या सर्व पटकथा लिहिणारे बहुतांश वेळा सलीम खान, जावेद अख्तर हीच मंडळी असतात. काही प्रसिद्ध हिंदी मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है ?’, ‘ये है चाहते’, ‘क्या मस्त है लाईफ’ इत्यादींमध्ये हिंदु नावे धारण करणारे मुख्य पुरुष कलाकार हे मोहसीन खान, अब्रार काझी, शाहीर शेख हे आहेत. सर्वसामान्यांना वाहिन्यांच्या पडद्यावर काम करणारे अभिनेते आणि अभिनेत्री यांची मूळ नावे माहिती नसली, तरी ती तरुण-तरुणींना माहिती असतात. मध्यंतरी चित्रपटांमध्ये जे पहायला मिळायचे, ते मालिकांमध्ये अधिक प्रमाणात पहायला मिळत आहे. हिंदु तरुणी त्याचेच अनुकरण करत आहेत आणि मुसलमान तरुणांमध्ये भावी जोडीदार पाहून स्वतःची फसगत करून घेत आहेत.

अल्पवयात आत्महत्या !

लव्ह जिहादचे एक कारण असले, तरी या निमित्ताने अन्य गोष्टींकडेही लक्ष वेधणे आवश्यक आहे. प्रत्युषा बॅनर्जी, कुलजित रंधवा, पल्लवी डे, दिशा गांगुली, शोभना या महिला कलाकारांनी प्रेमभंग, घरगुती कारणे इत्यादी कारणांनी अल्पवयात आत्महत्या केल्या असल्या, तरी या वयात मिळणारी पुष्कळ प्रसिद्धी, मान यांमुळे जाणवणारा ताण त्या सहन करू शकलेल्या नाहीत, हेसुद्धा लक्षात घ्यावे. ‘चकाकते ते सर्व सोने नसते’, अशी मराठीत एक म्हण आहे. छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर ‘चंदेरी दुनिये’त काम करणारे कलाकार, त्यांना मिळणारा पैसा, समाजातील प्रतिष्ठा यांचा अनेकांना हेवा वाटतो किंवा त्यांचे तसे बनण्याचे स्वप्न असते. परिणामी अनेकांचा कल कसेही करून काम आणि झटपट पैसा अन् प्रसिद्धी मिळवणे यांकडे असतो. चित्रपट, मालिका यांच्या सेटवर कुठल्या आव्हानांना त्यांना तोंड द्यावे लागते, त्यांच्या घरात, जीवनात कोणत्या समस्या भेडसावतात ? याची कल्पना नसते. हेच कलाकार मालिका, चित्रपट यांमधून जीवनाचे मर्म जाणल्याप्रमाणे किंवा तत्त्वज्ञाप्रमाणे संवादफेक (डायलॉग) करतात; मात्र जीवनात छोट्या-मोठ्या समस्यांपुढे हतबल होऊन थेट जीवनयात्राच संपवतात. तेव्हा ‘हेच का ते कलाकार ?’, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. त्यामुळे लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यासह मुलींना धर्मशिक्षित करणेही आवश्यक आहे.

मालिका, चित्रपट यांद्वारे केला जाणारा जिहाद रोखण्यासाठी कलाकार आणि जनता यांमध्ये जागृती करणे आवश्यक !