विविध टाकाऊ वस्तूंचा लागवडीसाठी कुंडीप्रमाणे वापर करावा !

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

सौ. राघवी कोनेकर

‘घरच्या घरी भाजीपाला लागवड करतांना ती अत्यल्प व्ययात केली, तर लाभदायक ठरते. सध्या पेठेमध्ये सर्वच प्रकारच्या कुंड्या, ग्रो-बॅग (लागवडीसाठीच्या पिशव्या) यांचे मूल्य अधिक आहे. ‘हा व्यय अल्प प्रमाणात व्हावा’, यासाठी विविध टाकाऊ वस्तूंचा कुंड्यांप्रमाणे वापर करता येतो. रंगांचे रिकामे डबे, आंब्याच्या जुन्या पेट्या, जाड पुठ्ठा असलेले खोके, धान्याच्या किंवा सिमेंटच्या गोण्या, फळवाल्यांकडील जुने प्लास्टिकचे क्रेट, रिकामे तेलाचे डबे, जुने टायर इत्यादींमध्येही लागवड करता येते. लहान रोपे सिद्ध करण्यासाठी आईस्क्रीम किंवा श्रीखंडाचे जुने डबे अथवा नारळाची करवंटीसुद्धा वापरता येते.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१३.१२.२०२२)