चिंचवड (जिल्हा पुणे) येथे समस्त हिंदूंच्या वतीने ‘हिंदु जनगर्जना’ मोर्चा

पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे), १७ डिसेंबर (वार्ता ) – ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर, गोवंश हत्या विरोधी कायदा राज्यासह देशात लागू करण्यात यावा, आदी प्रमुख मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड शहर सकल हिंदु समाजाच्या वतीने १८ डिसेंबर या दिवशी चिंचवड स्थानक येथे ‘हिंदु जनगर्जना मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. या विराट मोर्चाचा आरंभ सकाळी ९ वा चिंचवड स्थानक येथील क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारकापासून होणार असून मोर्चा महामार्गाने मार्गस्थ होत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे मोर्च्याचा समारोप होणार आहे. या मोर्च्यात पिंपरी-चिंचवड शहरासह आळंदी, देहू नगरपालिका, तसेच हिंजवडी मधून हिंदु समाज, अनेक संप्रदाय, संस्था, संघटना मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
हिंदु जनगर्जना मोर्च्यामध्ये अधिकाधिक हिंदूंनी सहभागी होऊन आपली शक्ती दाखवून देण्याची वेळ आली आहे, असे आवाहन सकल हिंदू समाज समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !