नवी मुंबई, १७ डिसेंबर (वार्ता.) – देशाला जगात पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकवणे आवश्यक असल्याचे मत अणूऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी येथे व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. अनिल काकोडकर म्हणाले की, शहर आणि ग्रामीण भागात आर्थिक विषमता दूर करण्यासाठी ग्रामीण भागात काम करणे आवश्यक आहे. रयत शिक्षण संस्थेचे शिक्षण देण्याचे योगदान या भागात पुष्कळ प्रमाणात आहे. इस्रायल, स्वीडन या देशांपेक्षा आपल्या देशात संशोधनावर अधिक खर्च होतो. तरीही आपल्या देशात तुलनात्मकदृष्ट्या अल्प संशोधन होत असते. याचे मूळ आपल्या शिक्षणपद्धतीत असल्याचे लक्षात आल्यावर संशोधन करणार्या शिक्षणसंस्था चालू करण्यात आल्या आहेत. भविष्यात यात वृद्धी होण्याची आवश्यकता आहे.