पुणे – रूपी सहकारी बँकेतील ठेवीदार आणि खातेदार यांनी त्यांच्या ५ लाख रुपयापर्यंतच्या ठेवी परत मिळण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत केवायसीसह (नो युवर कस्टमर) अर्ज करावेत. मुदतीमध्ये अर्ज न केल्यास आणि ठेवींची रक्कम मिळण्यास अडचण निर्माण झाल्यास रूपी बँकेचे दायित्व असणार नाही, अशी माहिती अवसायक धनंजय डोईफोडे यांनी दिली. ठेवीदारांनी आवश्यक पूर्तता करून योग्य कागदपत्रांसह बँकेच्या कोणत्याही शाखेत ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन रूपी बँकेने केले आहे.