वजूखान्यात शिवलिंग, तर भिंतींवर त्रिशूळ आणि हत्ती यांचे चिन्ह

दिवाणी न्यायालयाच्या आदेशानंतर येथील ज्ञानवापी मशिदीचे न्यायालय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्यात आले. हे चित्रीकरण न्यायालयाच्या आदेशानंतर हिंदु पक्षांना देण्यात आल्यानंतर काही घंट्यांतच त्यातील काही व्हिडिओ आणि छायाचित्रे उघड झाली आहेत.

भाकड गायींना वार्‍यावर सोडून देणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंद होणार !

गोमातेच्या रक्षणासाठी अशी कठोर भूमिका घेणार्‍या योगी आदित्यनाथ शासनाचे अभिनंदन ! अन्य भाजपशासित सरकारांनीही असा निर्णय घेणे अपेक्षित आहे !

काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून हिंदु महिला शिक्षिकेची हत्या

काश्मीरमध्ये कितीही आतंकवाद्यांना ठार केले, तरी पाकिस्तानमध्ये त्यांच्या निर्मितीचा कारखाना चालूच असल्याने काश्मीरमधील आतंकवाद पाकला नष्ट केल्याविना संपणार नाही, हीच वस्तूस्थिती आहे !

मालदा (बंगाल) येथे तृणमूल काँग्रेसच्या मुसलमान नेत्यांच्या दोन गटांमध्ये हिंसाचार !

बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा आधीच वाजलेले असतांना आता सत्ताधारी पक्षाचे लोकच हिंसाचार करत असतील, तर त्यात आश्‍चर्य ते काय ? अशांवर ममता बॅनर्जी कारवाई करतील, याची शक्यता अल्पच !

रा.स्व. संघाचा भगवा झेंडा एक दिवस राष्ट्रीय ध्वज बनेल ! – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार के.एस्. ईश्‍वरप्पा

सहस्रो वर्षांपासून भगव्या झेंड्याचा आदर केला जात आहे. भगवा झेंडा हा त्यागाचे प्रतीक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भगवा झेंडा एक दिवस भारताचा राष्ट्रीय ध्वज बनेल, यात काही शंका नाही.

(म्हणे) ‘गोव्यात धर्मांतरविरोधी कायद्याची आवश्यकता नाही !’ – मायकल लोबो, विरोधी पक्षनेते

गोव्यात न्यूनतम १ लाख ५० सहस्र लोकांचे धर्मांतर केले गेले आहे. १५ लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यातील ही संख्या विरोधी पक्षनेत्यांना अल्प वाटते का ? कि ते पास्टर डॉम्निक याच्या धर्मांतराच्या कारवायांना पाठिंबा देत आहेत ?

राज्यातील शाळेच्या बसगाड्यांना ‘जी.पी.आर्.एस्.’ प्रणाली बसवणे बंधनकारक !

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बसगाड्यांमध्ये ‘जी.पी.आर्.एस्.’ बसवण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी मुंबईतील पोदार शाळेतील बस सायंकाळी उशिरापर्यंत पोचली नव्हती.

नवी मुंबई येथे रस्त्याच्या कामासाठी २ सहस्र ५०० झाडे तोडण्याचा डाव !

पर्यावरणमंत्र्यांनी यात लक्ष घालून होणारी वृक्षतोड थांबवावी, ही अपेक्षा !

शनैश्‍वर देवस्थानकडून पूजा साहित्याच्या ताटातील सर्व यंत्रे मंदिरात नेण्यास बंदी !

शनिशिंगणापूर येथे अमावास्या यात्रेत मंदिर परिसरात यंत्रांचा सडा पडला होता. ती पायदळी तुडवली जात असल्याने त्यांचे पावित्र्य नष्ट होत असल्याच्या तक्रारी भाविकांनी राज्य सरकारकडे केल्या होत्या.

साकीनाका (मुंबई) येथील बलात्कारप्रकरणी मोहन चौहान न्यायालयाकडून दोषी !

साकीनाका येथील ३० वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने आरोपी मोहन चौहान याला दोषी ठरवले आहे.