‘प्रभु श्रीराम मांसाहारी होते’ असे केले होते वादग्रस्त वक्तव्य
शिर्डी – हिंदूंचे दैवत प्रभु श्रीराम यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या प्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बाबूराव पेंशनवार यांनी तक्रार प्रविष्ट केली होती. आमदार आव्हाड यांनी ‘शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. १४ वर्षे जंगलात असणारा राम शिकार करायचा. रामाने १४ वर्षे वनवास भोगला होता, मग तो शाकाहारी कसा असू शकतो ? राम मेथीची भाजी खायचा, हे कुणी सांगू शकेल का ?’, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.
संपादकीय भूमिकामुसलमानांच्या लांगूलचालनासाठी सातत्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या अशांवर कठोर करवाई होणे आवश्यक ! |