मुंबई – येथील १० समुद्रकिनारे धोकादायक, तर गिरगाव आणि जुहू चौपाटी पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित असल्याचे शासननिर्णय अन् पालिकेच्या नोंदीतून समजते. गिरगाव चौपाटी सार्वजनिकरित्या पोहण्यासाठी आणि जलक्रीडेसाठी, तर जुहू चौपाटीवरील वाय.सी.एम्.ए. ते रुईया पार्क हा भाग पोहण्यासाठी सुरक्षित आहे. वाळकेश्वर-वरळी, दादर, माहीम, वांद्रे ते खार, आक्सा, मनोरी, गोराई, मार्वे, टाटा गार्डन बी.डी. रोड आणि राजभवन अशा १२ ठिकाणचे समुद्रकिनारे असुरक्षित आहेत. हुल्लडबाज पर्यटक, प्रदूषणयुक्त पाणी, खळखळणारे पाणी यांमुळे ते असुरक्षित आहेत.
संपादकीय भूमिका१२ पैकी १० समुद्रकिनारे धोकादायक असणे हे महाराष्ट्राची राजधानी असणार्या मुंबईसाठी लज्जास्पदच होय ! |