नवी मुंबई येथे रस्त्याच्या कामासाठी २ सहस्र ५०० झाडे तोडण्याचा डाव !

प्रातिनिधिक चित्र

नवी मुंबई – औद्योगिक विकास महामंडळाच्या महापे विभागीय कार्यालयाकडून रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा असणारी २ सहस्र ५०० झाडे तोडण्यात येणार आहेत. अधिकाऱ्यांनी झाडांचे स्थलांतर न करता काम हाती घेतल्याने पर्यावरणवादी संस्थांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. अधिकारी कंत्राटदाराच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप आहे.

संपादकीय भूमिका

पर्यावरणमंत्र्यांनी यात लक्ष घालून होणारी वृक्षतोड थांबवावी, ही अपेक्षा !