रा.स्व. संघाचा भगवा झेंडा एक दिवस राष्ट्रीय ध्वज बनेल ! – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार के.एस्. ईश्‍वरप्पा

मध्यभागी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार के.एस्. ईश्‍वरप्पा

बेंगळुरू (कर्नाटक) –  सहस्रो वर्षांपासून भगव्या झेंड्याचा आदर केला जात आहे. भगवा झेंडा हा त्यागाचे प्रतीक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भगवा झेंडा एक दिवस भारताचा राष्ट्रीय ध्वज बनेल, यात काही शंका नाही. त्यागाची भावना जपण्यासाठी रा.स्व. संघ भगवा ध्वज समोर ठेवून पूजा करतो. राज्यघटनेनुसार तिरंगा झेंडा हा राष्ट्रध्वज आहे आणि तिरंग्याला जो मान द्यायला हवा, तो आम्ही देतो, असे विधान राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार के.एस्. ईश्‍वरप्पा यांनी केले. अनेक राजकीय नेत्यांनी या विधानाचा निषेध केला आहे.

विशेष म्हणजे के.एस्. ईश्‍वरप्पा यांनी फेब्रुवारी २०२२ मध्येही अशाच प्रकारचे विधान केले होते. त्या वेळी ते म्हणाले होते की, रा.स्व. संघाचा भगवा झेंडा एक दिवस तिरंग्याची जागा घेईल; पण ते इतक्या लवकर शक्य होणार नाही. त्याला बराच वेळ लागू शकतो; पण येत्या काळात लाल किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवला जाईल.’ त्यांच्या या विधानानंतरही गदारोळ झाला होता.