शासनाने अनुदान न दिल्याने अनेक गावांतील पथदीपांची वीजजोडणी तोडली : रस्त्यांवर अंधार

१४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील पथदीपांची देयके भरण्यासाठी तरतूद केली होती. त्यानुसार वीज वितरण आस्थापनाला रक्कमही वर्ग करण्यात आली होती; मात्र त्यानंतर सत्तेत आलेल्या आघाडीने ग्रामपंचायतींना वार्‍यावर सोडले आहे.

पोर्तुगीज राजवटीच्या विरोधात कुंकळ्ळीवासियांनी केलेल्या उठावाचा १५ जुलै हा दिवस ‘राष्ट्रीय युद्ध स्मारक दिन’ !

कुंकळ्ळीवासियांच्या पोर्तुगिजांच्या उठावाला उचित स्थान देणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे अभिनंदन ! याचबरोबर या उठाव्याचा इतिहास शैक्षणिक पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याची गोमंतकियांची मागणीही पूर्ण करावी, असे गोमंतकियांना वाटते !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘हिंदु धर्मात धर्मप्रसारासह धर्माच्या खोलात, सूक्ष्मात जाण्याला अधिक महत्त्व आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

वर्षभरात विविध बॅँकांमध्ये ६० सहस्र ५३० कोटींहून अधिक रुपयांचे घोटाळे !

अशा घोटाळ्यांमध्ये सर्वसामान्य ठेवीदारांचा पैसा भरडला जातो. यासह बँकांनी दिलेल्या अनेक कर्जांच्या रकमेची वसुली होत नसल्याने अशी कर्जे बडीत खात्यात वर्ग केली जातात.

‘मोनालिसा’ चित्रावर पॅरिसमध्ये आक्रमण

फ्रान्सच्या पॅरिस शहरातील लूवर संग्रहालयात प्रदर्शित केलेल्या लिओनार्दाे द व्हिन्सी यांनी रेखाटलेल्या ‘मोनालिसा’ या जगप्रसिद्ध चित्रावर नुकतेच आक्रमण करण्यात आले.

केरळमध्ये हिंदूंच्या वंशविच्छेदाच्या घोषणा देणाऱ्या १० वर्षीय मुसलमान मुलाच्या वडिलांना अटक

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या एका मोर्च्यामध्ये १० वर्षीय मुसलमान मुलाने हिंदूंचा वंशविच्छेद करण्याच्या संदर्भात चिथावणीखोर घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी हिंदुविरोधी घोषणा देणाऱ्या मुलाच्या वडिलांचा शोध घेतला. बेपत्ता झालेला मुतफर घरी आल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली.

मणीपूर येथे स्फोटात १ ठार

थौबल जिल्ह्यातील एका कम्युनिटी हॉलमध्ये आय.ई.डी.च्या झालेल्या एका स्फोटात १ कामगार ठार झाला, तर ४ जण घायाळ झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. हे सर्व जण मूळचे बंगालचे रहिवासी होते.