मालदा (बंगाल) येथे तृणमूल काँग्रेसच्या मुसलमान नेत्यांच्या दोन गटांमध्ये हिंसाचार !

  • गावठी बाँबचा वापर

  • १२ हून अधिक घरांची तोडफोड

मालदा (बंगाल) – येथे तृणमूल काँग्रेसच्या मुसलमान नेत्यांंच्या २ गटांत झालेल्या हिंसाचारात एकमेकांवर गावठी बाँब फेकण्यात आले, तर १२ हून अधिक अनेक घरांची तोडफोड करण्यात आली. यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

१. गोपालपूर बालूटोला येथे पंचायत समितीचे पदाधिकारी सैफुद्दीन शेख यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचा एक गट आणि पक्षाचे क्षेत्रीय अध्यक्ष नासिर अली यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्ते यांच्यामध्ये हा हिंसाचार झाला.

२. तृणमूल काँग्रेसच्या येथील आमदार सावित्री मित्रा यांनी सांगितले की, या दोन्ही नेत्यांमध्ये भूमीच्या प्रकरणी जुना वाद आहे. यातूनच यापूर्वीही हिंसाचार झाला आहे. या वादाशी आणि हिंसाचाराशी तृणमूल काँग्रेसचा काहीही संबंध नाही.

संपादकीय भूमिका 

  • बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा आधीच वाजलेले असतांना आता सत्ताधारी पक्षाचे लोकच हिंसाचार करत असतील, तर त्यात आश्‍चर्य ते काय ? अशांवर ममता बॅनर्जी कारवाई करतील, याची शक्यता अल्पच !
  • बंगालमध्ये हिंदूंवर आक्रमणे होत असतात, त्यामागेही तृणमूल काँग्रेसचे असेच नेते असल्यास आश्‍चर्य वाटू नये !