काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून हिंदु महिला शिक्षिकेची हत्या

उजवीकडे शिक्षिका रजीनी भल्ला

कुलगाम (जम्मू काश्मीर) – येथील गोपालपोरा भागातील एका सरकारी शाळेत शिक्षक असणार्‍या रजीनी भल्ला यांची जिहादी आतंकवाद्यांनी गोळीबार करून हत्या केली. रजीनी भल्ला या जम्मू विभागाच्या सांबा येथील रहिवासी होत्या.‘या आक्रमणात सहभागी असणार्‍या आतंकवाद्यांना लवकरच शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करू’, असे आश्‍वासन जम्मू-काश्मीर पोलिसांकडून देण्यात आले आहे. यापूर्वी १२ मे या दिवशी बडगाम जिल्ह्यात महसूल विभागाचे कर्मचारी राहुल भट यांची आतंकवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेविषयी दु:ख व्यक्त करतांना म्हटले आहे की, ही घटना फार दुःखद आहे. निषेध आणि शोक व्यक्त करणारे सरकारचे शब्द पोकळ आहेत. जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.

काश्मिरी हिंदूंचे गेल्या १८ दिवसांपासून चालू आहे आंदोलन  !

१२ मे या दिवशी राहुल भट या सरकारी कर्मचार्‍याची हत्या करण्यात आल्यानंतर गेल्या १८  दिवसांपासून खोर्‍यात काश्मिरी हिंदूंचे आंदोलन चालू आहे. ‘पंतप्रधान रोजगार पॅकेज’ अंतर्गत नोकर्‍या मिळालेल्या हिंदूंनी कामावर बहिष्कार घालून आंदोलन चालू केले आहे. खोर्‍यातील हे सर्वांत अधिक काळ चालणारे आंदोलन ठरले आहे. ‘आम्हाला काश्मीरबाहेर स्थानांतरित करावे’, अशी काम करणार्‍या काश्मिरी हिंदूंची मागणी आहे.

ते म्हणाले की, आम्हाला बंदीवानासारखे जीवन जगायचे नाही, त्यामुळेच आम्हाला काश्मीरमधून हलवा.

संपादकीय भूमिका 

  • काश्मीरमधील असुरक्षित हिंदू ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
  • काश्मीरमध्ये कितीही आतंकवाद्यांना ठार केले, तरी पाकिस्तानमध्ये त्यांच्या निर्मितीचा कारखाना चालूच असल्याने काश्मीरमधील आतंकवाद पाकला नष्ट केल्याविना संपणार नाही, हीच वस्तूस्थिती आहे !