‘मॅकडोनाल्ड्स’, ‘स्टारबक्स’, ‘पेप्सिको’ आणि ‘कोका-कोला’ यांच्याकडून रशियातील व्यवसाय तुर्तास स्थगित !

रशियाकडून युक्रेनवर आक्रमण करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ ‘मॅकडोनाल्ड्स’, ‘स्टारबक्स’, ‘पेप्सिको’ आणि ‘कोका-कोला’ या प्रसिद्ध अमेरिकी आस्थापनांनी रशियातील त्यांचा व्यवसाय तूर्तास स्थगित करण्याची घोषणा केली.

पाकमध्ये वर्ष २०२१ मध्ये ईशनिंदेच्या प्रकरणांमध्ये निम्मे आरोपी मुसलमानच !

पाकमध्ये मुसलमानच मुसलमानांवर ईशनिंदेचा आरोप करत असतील, तर अन्य धर्मियांची काय स्थिती असेल, हे लक्षात येते !

देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांना आत्मरक्षणासाठी प्रशिक्षण केंद्र आयोजित करणार ! – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला आणि तरुणी यांना आत्मरक्षण करता येण्यासाठी प्रशिक्षण केंद्र आयोजित करण्याची योजना बनवण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी एका कार्यक्रमात दिली.

कथावाचक मोरारी बापू अयोध्येतील श्रीराममंदिरासाठी विदेशातून मिळालेल्या धनाचा वापर युक्रेनमधील युद्धग्रस्तांसाठी करणार !

हिंदूंनी मंदिरासाठी अर्पण केलेले धन अन्य कार्यासाठी खर्च करायचे असेल, तर हे धन अर्पण केलेल्या हिंदूंची अनुमती घेणे आवश्यक आहे !

अमेरिकेत शिखांच्या विरोधात भेदभाव वाढला  ! – मानवाधिकार तज्ञांचा दावा

भारताने अमेरिकेतील शिखांवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे !

EXCLUSIVE : काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराच्या घोर यातना जगाला समजणे अत्यावश्यक !

‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या माध्यमातून या अत्याचारांना जागतिक पटलावर ठेवण्याचा दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांचा हा धाडसी प्रयत्न ! त्याला प्रसारमाध्यमांकडून अपेक्षित प्रसिद्धी देण्यात आलेली नाही, हे हिंदूंच्या भारताचे दुर्दैवच !

नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांचा विधानसभेत गदारोळ !

देशद्रोह्यांशी आर्थिक व्यवहार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मंत्रीपदाचे त्यागपत्र देण्याच्या मागणीसाठी ९ मार्च या दिवशी विधानसभेत विरोधकांनी गदारोळ घातला.

नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विधानभवनाच्या पायर्‍यांवर भाजपच्या आमदारांचे आंदोलन !

देशद्रोह्यांशी आर्थिक व्यवहार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी त्यागपत्र देण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायर्‍यांवर ९ मार्च या दिवशी सकाळी १०.३० वाजता आंदोलन केले.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांवरून सत्ताधार्‍यांकडून विधान परिषदेत गदारोळ !

विधान परिषदेत ९ मार्च या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था यांवरील चर्चेच्या वेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर गंभीर आरोप केले.

गडकिल्ल्यांसाठी संवर्धनाचे काम करतांना शिवभक्तांसह संस्थांना अनुमती देण्यास पुरातत्व विभागाकडून जाणीवपूर्वक विलंब ! – भरतशेठ गोगावले, आमदार, शिवसेना

गडदुर्ग हे शिवभक्तांसाठी प्रेरणास्रोत आहेत. राज्यात असणारे काही गडदुर्ग हे केंद्रीय पुरातत्व विभागाच्या, तर काही राज्य पुरातत्व विभागाच्या अंतर्गत आहेत. याशिवाय अनेक गडदुर्ग कोणत्याही विभागात नोंदवलेले नाहीत.