‘मॅकडोनाल्ड्स’, ‘स्टारबक्स’, ‘पेप्सिको’ आणि ‘कोका-कोला’ यांच्याकडून रशियातील व्यवसाय तुर्तास स्थगित !

न्यूयॉर्क (अमेरिका) – रशियाकडून युक्रेनवर आक्रमण करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ ‘मॅकडोनाल्ड्स’, ‘स्टारबक्स’, ‘पेप्सिको’ आणि ‘कोका-कोला’ या प्रसिद्ध अमेरिकी आस्थापनांनी रशियातील त्यांचा व्यवसाय तूर्तास स्थगित करण्याची घोषणा केली.

१. ‘युक्रेनमधील भयावह घडामोडींकडे पहाता आम्ही पेप्सिकोसमवेतच आमचे ‘सेवन अप’ आणि ‘मिरिंडा’ या शीतपेयांचीही विक्री बंद केली आहे’, अशी माहिती पेप्सिको आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रॅमन लगुआर्ता यांनी दिली.

२. कोका-कोलाच्या मुख्य अधिकार्‍यांनीही ते युक्रेनमधील नागरिकांसमवेत असल्याचे घोषित करून कोका-कोलासमवेत ‘स्प्राईट’ आणि ‘फँटा’ या त्यांच्या शीतपेयांचीही विक्री सध्या रशियामध्ये करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

३. मॅकडोनाल्ड्सनेही रशियातील त्यांचे सर्व हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.