देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांना आत्मरक्षणासाठी प्रशिक्षण केंद्र आयोजित करणार ! – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

नवी देहली – केंद्रीय  महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून चालवण्यात येणारे ‘वन स्टॉप सेंटर’ आणि पोलीस संशोधन अन् विकास विभाग यांच्या साहाय्याने देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला आणि तरुणी यांना आत्मरक्षण करता येण्यासाठी प्रशिक्षण केंद्र आयोजित करण्याची योजना बनवण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी एका कार्यक्रमात दिली. कोणत्याही महिलेला मारहाण, घरगुती हिंसा, हुंड्यासाठी छळ, लैंगिक अत्याचार आदी घटनांच्या वेळी ‘वन स्टॉप सेंटर’च्या माध्यमातून विशेष साहाय्य केले जाते.