जम्मूमध्ये पकडण्यात आलेल्या रोहिंग्यांना म्यानमारमध्ये पाठवा ! – सर्वोच्च न्यायालय

सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सुनावणीच्या वेळी म्हटले की, भारत सरकार म्यानमार सरकारशी याविषयी चर्चा करत आहे. सरकारच्या अनुमतीनंतर या रोहिंग्यांना परत पाठवले जाईल.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संगणकीय प्रणालीवर रशियातून आक्रमण झाल्याचे उघड !

एम्आयडीसी संगणकीय प्रणालीवर झालेले सायबर आक्रमण रशियातून झाल्याची माहिती पोलीस अन्वेषणात उघड झाली आहे.

पुणे येथे शासनाच्या निर्णयाविरोधात आंदोलन करणार्‍या व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद राका यांच्यासह ५० ते ६० व्यापार्‍यांवर गुन्हे नोंद !

व्यापार्‍यांना दुकाने उघडण्यासाठी अनुमती द्यावी, या मागणीसाठी ८ एप्रिल या दिवशी व्यापार्‍यांनी लक्ष्मी रस्त्यावर आंदोलन केले होते.

हिंदु समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर अस्वले यांच्या वतीने आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या विरोधात राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार

महंतपदावरील हिंदूंच्या एका धर्मगुरूंचा शिरच्छेद करण्याची मागणी समाजमाध्यमातून करणे हे अत्यंत धक्कादायक आहे.

नक्षलवाद्यांनी बंधक बनवलेल्या सैनिकाची सुटका

काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे २२ सैनिक हुतात्मा झाले होते, तर राकेश्‍वरसिंह मनहास या सैनिकाला नक्षलवाद्यांनी बंधक बनवले होते.

जीवघेणी संस्कृती !

अमेरिका आणि हिंसाचार हे समीकरण संपूर्ण विश्‍वासाठी काही नवीन नाही. तेथील प्रत्येक हिंसाचारात गोळीबार हा घटक तितकाच महत्त्वाचा ठरतो. मागील काही वर्षांमध्ये अमेरिकेत घडलेल्या घडामोडींचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की, तेथे मोठ्या प्रमाणात ‘बंदूक संस्कृती’ (गन कल्चर) फोफावत आहे.

खोकसा (जिल्हा नंदुरबार) येथील अवैध लाकूड फर्निचर कारखान्यांवर वन विभागाची धाड !

नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लाकूड तस्करीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. यात आंतरराज्यीय मोठ्या टोळीचा समावेश आहे. लवकरच या टोळीचा पर्दाफाश केला जाईल, – वन विभागाचे अधिकारी

अनाथालयातील मुलांवर लैैंगिक अत्याचार करणार्‍या धर्मांधाला अटक

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

चोरट्यांनी देवळातील चोरलेल्या घंटा परत केल्या !

सामूहिक प्रार्थनेमध्ये किती शक्ती आहे, हेच यातून स्पष्ट होते ! बुद्धिप्रामाण्यवादी, नास्तिकतावादी आणि पुरो(अधो)गामी यांना प्रार्थनेचे महत्व काय कळणार !

भारताचा जीडीपी १२.५ टक्के होण्याची शक्यता ! – जागतिक नाणेनिधीचा अंदाज

भारताचा विकासदर विक्रमी म्हणजे १२.५ टक्के इतका असेल, असे जागतिक नाणेनिधीने तिच्या अहवालात म्हटले आहे. वर्ष २०२२ पर्यंत जागतिक अर्थव्यवस्था ६.९ टक्क्यांनी  वृद्धींगत होईल, असेही नाणेनिधीने यात म्हटले आहे.