‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचे आस्थापनानुसार मूल्य निश्‍चित !

भारत सरकारने ‘रेमडेसिविर’ हे इंजेक्शन कोविड रुग्णांना आपत्कालीन वापरासाठी घेण्यास मान्यता दिली आहे.

कोरोना लसीकरण आणि चाचणी बंधनकारक केल्यामुळे नगर येथील चाचणी अन् लसीकरण केंद्रावर संबंधितांची गर्दी

आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी आणि लसीकरण करून घेण्यासाठी सरकारी रुग्णालये, सेवाभावी संस्थांच्या वतीने चालवण्यात येणारी केंद्र येथे गर्दी आहे.

अमेरिकेत १९ एप्रिलपासून सर्व प्रौढ व्यक्तींचे कोरोना लसीकरण

अमेरिकेत १९ एप्रिलपासून सर्व प्रौढ व्यक्तींना कोरोना लस देण्यात येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ही घोषणा केली. अमेरिकेत आतापर्यंत १५ कोटी जणांना लस देण्यात आली आहे.

चारचाकी गाडीमध्ये एकटे असतांनाही मास्क वापरणे बंधनकारक ! – देहली उच्च न्यायालयाचा आदेश

चारचाकी वाहनातून एकट्याने प्रवास करत असतांनाही मास्क वापरणे बंधनकारक आहे, असा निर्णय देहली उच्च न्यायालयाने दिला आहे. ‘करोनाचा प्रसार रोखण्यात मास्क हे सुरक्षा कवचासारखे आहे.

(म्हणे) ‘भगवान अय्यप्पा आणि सर्व देवता माकपच्या समवेत !’ – केरळचे हिंदुद्वेषी मुख्यमंत्री पिनराई विजयन्

आता निवडणूक जिंकण्यासाठी हिंदूंची मते मिळावीत, यासाठी ‘देव नाही’, असे म्हणणार्‍या नास्तिकतावादी माकपवाल्यांना हिंदूंच्या देवतांची आठवण झाली आहे, हेच यातून लक्षात येते !

हॅकर्सनी बँकेतून खातेदारांचे ऑनलाईन पैसे काढल्यास १० दिवसांत पैसे परत मिळणार !

हॅकर्सकडून बँकेतून पैसे काढण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याने रिझर्व्ह बँकेने खातेदारांना हे पैसे परत मिळतील, यासाठी दिशानिर्देश जारी केले आहेत.

जर आम्ही हिंदूंना आवाहन केले असते, तर निवडणूक आयोगाने नोटीस बजावली असती !

पंतप्रधान मोदी यांची मुसलमानांकडे मतांचे आवाहन करणार्‍या ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

येत्या ४ आठवड्यांत जागतिक महायुद्धाला प्रारंभ होईल ! – रशियातील संरक्षणतज्ञाचा दावा

येत्या ४ आठवड्यांत म्हणजे मासाभरात जागतिक युद्धाला प्रारंभ होऊ शकतो, असा दावा रशियाचे संरक्षणतज्ञ पावेल फेलगेनहॉर यांनी केला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचे महायुद्धात रूपांतर होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

आठवड्याच्या शेवटी घोषित केलेली दळणवळण बंदी कोरोनाला रोखण्यासाठी पुरेशी प्रभावी नाही ! – केंद्रशासनाकडून महाराष्ट्र शासनाला सूचना

राज्यशासनाचे लक्ष दळणवळण बंदीवर न रहाता कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यावर असायला हवे. रात्रीची संचारबंदी आणि आठवड्याच्या शेवटी (‘वीक एंड’ला) घोषित करण्यात आलेली दळणवळण बंदी यांचा कोरोनाच्या संक्रमणावर फारच मर्यादित प्रभाव पडतो.

सनातन संस्था ही ईश्‍वराची वाणी ! – स्वामी बोधानंदेंद्र सरस्वती महाराज

हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’चे उद्घाटन