देवालयातील सदस्यांनी केलेल्या सामूहिक प्रार्थनेचा परिणाम !
सामूहिक प्रार्थनेमध्ये किती शक्ती आहे, हेच यातून स्पष्ट होते ! बुद्धिप्रामाण्यवादी, नास्तिकतावादी आणि पुरो(अधो)गामी यांना प्रार्थनेचे महत्व काय कळणार !
शिवमोग्गा (कर्नाटक) – आनंदपूर होसगुंद येथील श्री कंचिकाळम्मा देवालयातून चोरण्यात आलेल्या २ घंटा ५०० रुपये चुकांचे परिमार्जन म्हणून चोरांनी अर्पण देऊन परत केल्या आहेत. २४ मार्चला सायंकाळी पुजारी देवालयात पूजा करून कुलूप लावून गेल्यानंतर प्रवेशद्वाराजवळ असलेल्या २ मोठ्या घंटा दुचाकीवरून आलेल्या ३ चोरांनी चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी देवालयातील सर्व समिती सदस्यांनी एकत्र येऊन विशेष पूजा करून, ‘घंटा मिळूदे, चोरांना शिक्षा होऊ दे’, अशी प्रार्थना केली होती.