जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांनी अग्नीसुरक्षेचे लेखापरीक्षण करून घेण्याचा विभागीय आयुक्त सौरभ राव यांचा आदेश !
रुग्णालयांमध्ये शॉर्टसर्किट किंवा इतर कारणांमुळे आगीच्या घटना घडू नयेत, यासाठी शासकीय आणि खासगी रुग्णालयांचे अग्नीसुरक्षा लेखापरीक्षण होणे आवश्यक असल्याचे विभागीय आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.