कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडून ७०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त ! – तीरथसिंह रावत, मुख्यमंत्री, उत्तराखंड

कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडून ७०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी ‘ऑनलाईन’ पत्रकार परिषदेमध्ये दिली.

रांगिया (आसाम) येथे अज्ञातांनी फडकावलेला पाकचा राष्ट्रध्वज स्थानिकांनी जाळला !

विरोधकांनी याला भाजपच उत्तरदायी असल्याचा आरोप केला. भाजप राज्यात धार्मिक फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप केला; मात्र हा झेंडा नेमका कुणी लावला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

‘कोवॅक्सिन’च्या तिसर्‍या डोसच्या चाचणीला अनुमती

औषध नियंत्रणाविषयीच्या तज्ञांच्या समितीने ‘कोवॅक्सिन’ लसीचा तिसरा डोस देण्याच्या चाचणीला अनुमती दिली आहे. या डोसमुळे शरिरातील कोरोनाविरोधी रोगप्रतिकारक शक्ती अनेक वर्षांसाठी वाढणार आहे.  

भ्रमणभाष संचावर खेळ खेळण्यावरून आईवडील ओरडल्याने १५ वर्षांच्या मुलाची आत्महत्या

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रात जीवनाचे महत्त्व आणि ध्येय सांगून व्यक्तीला शाश्‍वत आनंद मिळण्यासाठी मार्गदर्शन करणारे शिक्षण देण्यात येईल. त्यामुळे कुणीही आत्महत्या करणार नाही !

भारताच्या ७ शेजारी देशांतील हिंदूंची स्थिती चिंताजनक !

भारतातील हिंदूंचीच स्थिती जेथे चांगली नाही, तेथे अन्य देशांतील हिंदूंची आणि तेही इस्लामी देशांतील हिंदूची स्थिती कधीतरी चांगली असू शकते का ? ही स्थिती पालटण्यासाठी सर्वप्रथम भारतातील हिंदूंची स्थिती चांगली करण्यासाठी येथे हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे.

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे भाजपच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या

उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे चालूच ! राज्यात साधू, संत, महंत, हिंदुत्वनिष्ठ यांच्या हत्या होणे आणि आता राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कर्मभूमीतच अशा प्रकारच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

(म्हणे) ‘पैगंबर यांचा अवमान करणार्‍यांचा शिरच्छेद केला पाहिजे !’ – आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान

भारतीय कायदे अनेक गोष्टींना अनुमती देत नाहीत; मात्र तरीही धर्मांधांकडून त्यांचे उल्लंघन करून कायदाद्रोही कृत्ये केली जातात. कमलेश तिवारी यांच्याविषयी हेच घडलेले आहे.

गुरु ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे भारतासहित संपूर्ण जगामध्ये युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते ! – ज्योतिर्विद पंडित दिवाकर त्रिपाठी, संचालक, ‘उत्थान’ ज्योतिष संस्थान

येणारा काळ हा संकटकाळ असणार आहे, हे अनेक संत-महंतांनी सांगितले आहे. हे लक्षात घेऊन या संकटकाळात तरून जाण्यासाठी साधना करणे आवश्यक !

(म्हणे) ‘सध्याचे शासनकर्ते भारताला हिंदु राष्ट्र बनवू पहात आहेत !’ –  शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटीचा आरोप

सध्याच्या शासनकर्त्यांनी भारताला हिंदु राष्ट्र बनवले, तर त्यात चूक ते काय ? हिंदूंच्या राज्यात शिखांना कसली भीती ?

दायित्वशून्य नागरिकांमुळे कोरोनाच्या धोक्यात वाढ ! – सौ. किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई

आरोग्य यंत्रणेवरील बोजा अल्प करायचा असेल, तर नियम पाळायलाच हवेत.