संशोधनाच्या संदर्भात कुठे बालवाडीतील असल्याप्रमाणे पाश्‍चात्त्य संशोधक, तर कुठे सर्वज्ञ ऋषि !

‘कुठे एखाद्या विषयाचे काही वर्षे संशोधन करून संख्याशास्त्रावरून (Statistics वरून) निष्कर्ष काढणारे पाश्‍चात्त्य संशोधक, तर कुठे कुठल्याही प्रकारचे संशोधन न करता मिळणार्‍या ईश्‍वरी ज्ञानामुळे कुठल्याही विषयांवरील निष्कर्ष तात्काळ सांगणारे ऋषि !’

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या अनमोल सत्संगामुळे आरंभी साधनेला स्वत:चा विरोध असूनही पूर्णवेळ साधना करण्याच्या निर्णयाप्रत पोचलेल्या डोंबिवली येथील सौ. नेहाली शिंपी !

सौ. नेहाली शिंपी यांना सद्गुरु अनुताईंनी त्यांच्या नकळत साधक बनवले आणि वेळोवेळी मार्गदर्शन करून पूर्णवेळ साधना करण्यास प्रवृत्त केले. सौ. नेहाली शिंपी यांच्या साधनेचा हा प्रवास येथे देत आहोत. काल ९ एप्रिलला या साधनाप्रवासातील काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.

आकाशातील रंग पहातांना मन शांत होणे, आकाशात अनेक ऋषी दिसून काही क्षणांतच ते अंतर्धान पावणे, नंतर १ घंटा गारवा जाणवणे

‘१६.५.२०१५ या दिवशी सायंकाळी ७.१० वाजता आश्रमातील साधकांना आकाशातील रंग पहायला सांगितले होते. ते पहात असतांना माझे मन शांत झाले. ‘काही क्षण फिकट गुलाबी रंग, तर काही वेळाने सर्वत्र केवळ पांढरा रंग व्यापला आहे’, असे मला जाणवले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेले सवत्स गोमातापूजन आणि नंदीपूजन या वेळी साधकाला जाणवलेली सूत्रे

साधकाला गोपूजन चालू असतांना गोमातेविषयी जाणवलेली सूत्रे आणि त्या वेळी आलेली अनुभूती

गोवा येथील शंकर पालन रुग्णाईत असतांना त्यांची सेवा करतांना त्यांचा मुलगा आणि सून यांना संतांच्या कृपेची आलेली प्रचीती !

रामनाथी आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्‍या कु. योगिता पालन यांचे वडील शंकर पालन यांचे ३०.३.२०२१ या दिवशी निधन झाले. १०.४.२०२१ या दिवशी त्यांचा मृत्यूनंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने शंकर पालन यांचा मुलगा आणि सून यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

साधक असे अपूर्ण, गुरु माझा तो पूर्णब्रह्म ।

गुरुदेवा, शब्दब्रह्म ते अपुरे, तुझे वर्णन करावया ।
कोणती वाणी आणू, तुझे वर्णन करावया ।
कशी होऊ उतराई ॥ १ ॥

नश्‍वर देह आणि आत्मा

‘या नश्‍वर देहास बाहेरून सजवण्यासाठी निरनिराळे अलंकार घातले, निरनिराळ्या प्रकारची उटणी, साबण यांनी स्वच्छ करून आणि सुवासिक करण्याचा प्रयत्न केला, तरी त्या देहातील आत्म्यास त्याचा काहीही उपयोग नसतो.