नक्षलवाद्यांनी बंधक बनवलेल्या सैनिकाची सुटका

नक्षलवाद्यांनी बंधक बनवलेले सैनिक राकेश्‍वरसिंह मनहास

विजापूर (छत्तीसगड) – येथे काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे २२ सैनिक हुतात्मा झाले होते, तर राकेश्‍वरसिंह मनहास या सैनिकाला नक्षलवाद्यांनी बंधक बनवले होते.

या प्रकरणी सरकारने बनवलेल्या एका समितीने नक्षलवाद्यांशी केलेल्या चर्चेनंतर मनहास यांची नक्षलवाद्यांकडून सुटका करण्यात आली. राकेश्‍वरसिंह मनहास हे जम्मू येथील रहाणारे आहेत.