तज्ञांशी बोलून येत्या २-३ दिवसांत दळणवळण बंदीविषयीचा निर्णय घेणार ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

शासन जनतेच्या हितासाठीच पावले उचलत आहे; मात्र परिस्थिती अशीच राहिली, तर आहे ती परिस्थिती उघड्या डोळ्यांनी मी स्वीकारू शकत नाही. आता मी पूर्ण दळणवळण बंदीची चेतावणी देत आहे; मात्र आता दळणवळण बंदी घोषित करत नाही.

मंदिरांच्या दानपेटीत गर्भनिरोधक आणि अश्‍लील पत्रे टाकणार्‍या दोघा धर्मांधांना अटक !

‘देव नाही’ असे म्हणणार्‍या अंनिसवाल्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

केरळमध्ये लव्ह जिहाद असल्यास त्याची चौकशी करण्याची मागणी करणारे विधान काँग्रेसच्या नेत्याने मागे घेतले !

साम्यवादी पक्षाचे नेते लव्ह जिहादच्या चौकशीला इतके का घाबरतात, हे जगजाहीर आहे. त्यांचा लव्ह जिहाद करणार्‍यांना छुपा पाठिंबा असल्याने ते अशा प्रकारची कोणतीही चौकशी होऊ देणार नाहीत, हे लक्षात घ्या !

आसाममध्ये भाजपच्या उमेदवाराच्या गाडीमध्ये इ.व्ही.एम्. यंत्र आढळल्याने ४ अधिकारी निलंबित

आसामच्या पाथरकंडी विधानसभा क्षेत्रात एका पांढर्‍या रंगाच्या बोलेरो गाडीमध्ये ई.व्ही.एम्. (इलेक्ट्रिक व्होटिंग मशीन) यंत्र आढळून आले आहे. विशेष म्हणजे गाडी भाजपचे आमदार आणि सध्याचे उमेदवार कृष्णेंदू पॉल यांची आहे, असे सांगण्यात येत आहे.

पुलवामा येथे ४ आतंकवादी ठार

भारतात जिहादी आतंकवादी त्यांच्या कारवाया करण्यासाठी बुरख्याचा वापर करतात, हे लक्षात घेऊन भारतात किंवा प्रथम काश्मीरमध्ये तरी बुरख्यावर बंदी घातली पाहिजे !

लाल किल्ल्यातील मशिदीच्या पायर्‍यांखाली गाडले आहेत श्रीकृष्ण मंदिरातील प्राचीन मूर्ती !

अशी मागणी का करावी लागते ? केंद्र सरकारने स्वतः याची नोंद घेऊन हिंदूंचा गाडलेला गौरवशाली वारसा पुन्हा मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

वाराणसी येथे होळीच्या दिवशी अंगावर रंग उडाल्याने धर्मांधांकडून हिंदूंवर दगडफेक !

सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता यांचा ठेका केवळ हिंदूंनी घ्यायचा आणि अन्य धर्मियांनी हिंदूंवर आक्रमणे करायची, हेच भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांना अपेक्षित आहे का ?

एप्रिल ते जून या मासांमध्ये भारतातील काही भागांत भीषण उन्हाळा असणार ! – हवामान खात्याचा अंदाज

उत्तर भारतात सध्या उष्माघाताची स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार दक्षिण भारतातील काही भाग, पूर्व भारतातील काही भाग, तसेच पूर्वोत्तर भागातील तापमान सामान्यपेक्षा अल्प असणार आहे.