सोलापूर, कलबुर्गी (कर्नाटक), नगर येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीट आता ५० रुपये !

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रेल्वे स्थानकातील गर्दी न्यून होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म (फलाट) तिकीट दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

निधन वार्ता

तानाजीनगर केंद्रातील सनातनच्या साधिका सौ. वैशाली कुलकर्णी यांचे जावई योगेश दिलीप कुलकर्णी (वय ४२ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे निधन झाले.

लोकप्रतिनिधी आणि त्यांचे नातेवाइक यांंमुळे वयोवृद्ध नागरिक लसीकरणासाठी घंटोन्घंटे रांगेतच !

नागरिक दिवस उगवला की, त्वरित लसीकरण केंद्र गाठत आहेत. घंटोन्घंटे रांगेत उभे राहिल्यानंतर लसीकरणासाठी क्रमांक येत आहे; मात्र त्यातही लोकप्रतिनिधी आणि त्यांने नातेवाईक हे मागील दाराने जाऊन नोंदणी करून लस टोचून घेत आहेत.

संचारबंदीत नियम मोडणार्‍यांकडून १८ लाख रुपयांचा दंड वसूल !

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने संचारबंदी लागू केली आहे, मात्र शहरात संचारबंदीच्या नियमांची पायमल्ली होत आहे. शिवाजीनगर येथील जनवाडी येथे अरुण कदम चौकात बंदीच्या वेळेतही दुकाने चालू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

कोल्हापूर शहरात गारांचा वर्षाव

अनेक दिवसांच्या उकाड्यानंतर त्रस्त झालेल्या कोल्हापुराकरांना २९ एप्रिल या दिवशी सायंकाळी ५ वाजता गारांच्या वर्षावाचा आनंद लुटला. मोठ्या प्रमाणात पडलेल्या आणि मोठ्या आकाराच्या गारांमुळे काही काळ रस्तेही पांढरे शुभ्र झाले होते.

पुस्तके घरपोच वितरण करण्यास परवानगी द्या ! – मराठी प्रकाशक संघाची मागणी

केरळच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही पुस्तकांचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करावा आणि दळणवळण बंदीच्या काळात पुस्तकांचे घरपोच वितरण करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

संभाजीनगर येथे कोरोनाग्रस्तांच्या साहाय्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स हेल्प रायडर्सची विनामूल्य सेवा !

सध्या कोरोनाचे संकट वाढलेले असतांना शहरातील अनेक नातेवाइकांना विविध सुविधा मिळवण्यात अडचणी येत आहेत.रुग्णालयात जागा मिळवून देणे, अ‍ॅम्ब्युलन्स, प्लाझ्मा डोनेशन, बाहेरून लागणारी औषधे नेऊन देण्याचे काम हा ग्रुप करत आहे.

लसीचा साठा संपल्यामुळे पुण्यातील बहुतांश लसीकरण केंद्रे बंद !

कोरोना प्रतिबंधक लस संपल्यामुळे २८ एप्रिल या दिवशी शहरातील सर्वच लसीकरण केंद्रे अनिश्‍चित कालावधीसाठी बंद झाली आहेत. ज्या केंद्रांमध्ये कोवॅक्सिनचा साठा आहे, त्याच केंद्रांवर लसीकरण काही प्रमाणात चालू आहे. लसीचा साठा उपलब्ध होण्याविषयी अनिश्‍चितता आहे.

इंदापूर (पुणे) येथे अवैध ऑक्सिजन साठा जप्त, भरलेले ५१ सिलिंडर ताब्यात !

इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील एम्.आय.डी.सी.मधील वाय अ‍ॅक्सिस स्ट्रक्चरल स्टील प्रा. लि. या आस्थापनात इंदापूर पोलिसांनी धाड टाकत ७ लाख ५५ सहस्र ७०० रुपयांचा अवैध ऑक्सिजन साठा जप्त केला.

सिंधुदुर्गातील एस्.टी. कर्मचार्‍यांना आता ‘बेस्ट’ परिवहन सेवेत पाठवले जाणार नाही

मुंबई येथे सेवेसाठी गेलेल्या अनेक कर्मचार्‍यांना, तसेच त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.