निधन वार्ता

नातनच्या साधिका सौ. वंदना जोशी यांचे वडील विजयकुमार महाजन (वय ७५ वर्षे) यांचे १८ एप्रिल या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात २ मुली, २ जावई, १ मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या विरोधात सामाजिक माध्यमात आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केल्याच्या प्रकरणी पोलिसात तक्रार प्रविष्ट

छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण समाजाला देणारे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना अपकीर्त केल्याने गोमंतकियांच्या भावना दुखावल्या आहेत.

प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्याकडून पू. भिडेगुरुजी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गोव्यातील हिंदुत्वविषयक घडामोडींवर चर्चा

गोव्यात भाजपचे सरकार असूनही हिंदुत्वनिष्ठ संघटना श्रीरामसेना आणि श्रीरामसेनेचे प्रमुख श्री. प्रमोद मुतालिक यांच्यावर गोव्यात प्रवेशबंदी घातली आहे.

सिंधुदुर्गात दिवसभरात कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू

सिंधुदुर्गात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

राज्यात अनेक डॉक्टर कोरोनाबाधित, कोरोनाची दुसरी लाट खूप प्रबळ ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

कोरोनाबाधित रुग्णांना भूमीवर आणि स्ट्रेचरवर झोपावे लागते.

दोडामार्ग तालुक्यातून गोव्यात कामानिमित्त ये-जा करणार्‍यांना आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी बंधनकारक

कामानिमित्त गोव्यात ये-जा करायची असल्यास आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.

देहलीमध्ये २६ एप्रिलपर्यंत दळणवळण बंदी घोषित

देहली राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दळणवळण बंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपराज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात पार पडलेल्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्रात कडक दळणवळण बंदी लागू करण्याविषयी २ दिवसांत निर्णय अपेक्षित ! – विजय वडेट्टीवार, साहाय्य आणि पुनर्वसन मंत्री

अनेक व्यापार्‍यांचा दळणवळण बंदीला विरोध होता; मात्र आता व्यापारी, जीवनावश्यक वस्तूंचे वितरक आणि अन्य लहान दुकानदार १०० टक्के दळणवळण बंदीची मागणी करत आहेत.

देहलीमध्ये मास्कविषयी विचारणा केल्याने दांपत्याकडून पोलिसांना शिवीगाळ

मास्क न लावता चारचाकी गाडीतून प्रवास करणार्‍या दांपत्याला पोलिसांनी रोखल्यावर या दांपत्याने पोलिसांना शिवीगाळ केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

कर्करोग बरा करण्याच्या नावाखाली हिंदु कुटुंबाकडून ८० सहस्र रुपये उकळणार्‍या पाद्य्राच्या विरोधात गुन्हा नोंद

अशा बातम्या तथाकथित ढोंगी निधर्मीवादी प्रसारमाध्यमे दडपतात आणि अंनिसवाले भोंदू ख्रिस्ती पाद्य्रांविषयी काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !