सांगली जिल्ह्यात दळणवळण बंदी शिथिल

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम, सेवा बंद रहातील, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी निर्गमित केले आहेत.

अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग गतीने होण्यासाठी आमचा प्रयत्न ! – जयंत पाटील, जलसंपदामंत्री

अतीवृष्टी होऊन नद्यांना पूर आला, तर त्याविषयी विशेष काळजी घेतली जाणार आहे. जलसंपदा विभाग आणि महसूल विभाग आतापासून दक्ष आहे. कर्नाटक राज्याच्या आपण संपर्कात आहोत.

आषाढी वारीसाठी नियमांसह अनुमती द्यावी, अन्यथा मंत्रालया समोर आंदोलन करू ! – ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ

पंढरपूर पोटनिवडणूक घेण्यात आली. निकालानंतरचा विजयोत्सव साजरा करण्यात आला, मग राजकीय कार्यक्रम चालतात, तर वारीला अडचण का ?

हिंदु पोलीस अधिकारी असल्याचे सांगून हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करणार्‍या धर्मांधाला अटक

देशात अशा प्रकारे बनावट मतदान ओळखपत्रे बनवली जातात, हे पोलिसांना आणि प्रशासनाला ठाऊक कसे नाही ? संबंधित उत्तरदायींना देशद्रोहाच्या गुन्ह्यांतर्गत कठोर शिक्षा केली पाहिजे ! – संपादक

हुंड्यासाठी सासरच्या छळाला कंटाळून बारामती येथील विवाहितेची आत्महत्या

विवाहात सोने कमी दिल्याच्या कारणास्तव, तसेच विवाहानंतरही वडिलांकडून ५० तोळे सोने घेऊन येण्याच्या मागणीसाठी पतीकडून होणार्‍या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून विवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.

अहिल्यादेवींनी अनेक ठिकाणी घाट, मंदिरे, धर्मशाळा उभारून सर्वसामान्य जनतेला आधार दिला ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्यालयात अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यावर ते बोलत होते.

सैफई (उत्तरप्रदेश) येथे मद्य विक्रीच्या दुकानांबाहेर ‘लस घेतलेल्यांनाच दारू मिळणार’ अशी सूचना !

‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असा हा प्रकार होय ! त्यापेक्षा मद्याची दुकानेच बंद केली, तर बर्‍याच समस्या सुटतील, हे प्रशासनाच्या का लक्षात येत नाही ?

आंध्रप्रदेश सरकार आणि पोलीस यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले !

वाय.एस्.आर्. काँग्रेस सरकारने त्याचे ख्रिस्तीप्रेम उघड करणार्‍या स्वपक्षातील खासदाराला अधिकारांचा दुरुपयोग करून अटक केली. ही सरकारची मोगलाई असून हा लोकशाहीचा अवमानच आहे. यासाठी न्यायालयाने संबंधितांना शिक्षा केली पाहिजे !

कुचबिहार (बंगाल) येथे भाजपच्या कार्यकर्त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळला !

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट न लावल्याने अशा हत्या चालूच आहेत आणि पुढेही चालूच राहिल्या, तर आश्‍चर्य वाटू नये !

कोरोना लस भरलेल्या सीरिंज फेकून देणार्‍या आरोग्य कर्मचारी नेहा खान यांच्यावर गुन्हा नोंद

जमालपूरच्या शहर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कचरापेटीमध्ये कोरोना लस भरलेल्या २९ सीरिंज सापडल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी येथील लसीकरण विभागाच्या प्रमुख असणार्‍या नेहा खान यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.