निधन वार्ता

सनातनची साधिका कु. पल्लवी धर्माधिकारी  यांचे वडील बाबुराव बळवंत धर्माधिकारी (वय ७३ वर्षे) यांचे २२ एप्रिल या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले.

ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात येणार पोलीस ठाण्यांचे सॅनिटायझेशन !

याविषयी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर, पंढरपूर ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर पुढील कृती करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे विजय तेंडुलकर यांनी सांगितले.

बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे लस घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी !

शहरात शासकीय लसीकरण केंद्राच्या समोर २३ एप्रिल या दिवशी नागरिकांची झुंबड उडाली होती. दिवसभर रांगेत उभारून नागरिक लस घेत होते.

चैत्रवारीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा आणि श्री विठ्ठलाला द्राक्षांची सजावट !

चैत्रवारीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुजार्‍यांच्या हस्ते करण्यात आली.चैत्र एकादशीनिमित्त मंदिरात द्राक्ष आणि द्राक्ष वेलींची सुंदर सजावट करण्यात आली होती.

गुरुदेव तपोवन, टाकळी (जिल्हा सांगली) येथे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या औषधाचे विनामूल्य वाटप !

श्री सिद्धगिरी कणेरी मठाच्या वतीने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सिद्ध करण्यात आलेल्या औषधांचे वाटप वेदांत केसरी मल्लिकार्जुन गुरुदेव तपोवन टाकळी येथे प्रतिदिन सकाळी ८ ते १० या वेळेत करण्यात येत आहे.

वीज गेल्याने अतीदक्षता विभागातील व्हेन्टिलेटरवरील कोरोनाबाधित रुग्णांच्या जीवाला धोका

व्हेन्टिलेटरवर असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.

कोरोना काळातही पालिका कर्मचार्‍यांना मिळणार ७ व्या वेतन आयोगाचा अनुशेष (फरक)

सातारा नगरपालिकेत काम करणार्‍या ४५५ कर्मचार्‍यांना मे मध्ये लागू झालेल्या ७ व्या वेतन आयोगाचा अनुशेष (फरक) दिला जाणार आहे.

रेमडेसिविर, ऑक्सिजन, एच्.आर्.सी.टी. टेस्ट यांविषयी संभ्रम दूर होणे आवश्यक ! – डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली

रेमडेसिविर औषधाचा दुष्परिणाम हायपरसेंसेटीव्हीटी, किडनीवर ताण येणे, यकृताला सूज येणे अशा गोष्टी १० दिवसांत आढळू शकतात.

बेलमाची (जिल्हा सातारा) येथे वीर पत्नींना भूमी वाटप

हुतात्मा सैनिक गणेश ढवळे यांच्या वीर पत्नी रेश्मा गणेश ढवळे आणि फत्यापूर येथील हुतात्मा सैनिक दीपक घाडगे यांच्या वीर पत्नी निशा दीपक घाडगे यांना भूमी वाटप करण्यात आली.