वर्ष २०२२ च्या शेवटपर्यंत जग कोरोनापासून पूर्णपणे मुक्त होईल ! – बिल गेट्स

वर्ष २०२२ च्या शेवटपर्यंत जग कोरोनाच्या महामारीतून पूर्णपणे मुक्त होईल आणि परत मूळ पदावर येईल, असे विधान मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी केले आहे. पोलंडचे वृत्तपत्र गॅझेटा वायबोर्झा आणि ‘टीव्हीएन् २४’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले.

बाटलीबंद पाणी विक्रीसाठी भारतीय मानक ब्युरोचे प्रमाणपत्र आवश्यक ! – भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा नवा नियम

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (‘एफ्.एस्.एस्.ए.आय.आय.’ने) बाटलीबंद पाणी आणि मिनरल पाणी उत्पादकांसाठी भारतीय मानक ब्युरोचे (बी.आय.एस्.’चे) प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. १ एप्रिल २०२१ पासून हा नियम लागू होणार आहे.

आसाममध्ये पुन्हा सत्तेत आल्यास ‘लँड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ यांच्या विरोधात कायदे करू ! – अमित शहा यांचे आश्‍वासन

केवळ आसामसाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी असे कायदे केंद्र सरकारने केले पाहिजेत ! इतकेच नव्हे, तर समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा, धर्मांतर बंदी कायदा आदी कायदेही करणे आवश्यक आहेत !

बंगालमध्ये भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी यांच्या भावाच्या गाडीवर आक्रमण

बंगालमध्ये निवडणूक चालू असतांनाही अशा प्रकारच्या घटना घडत असतील, तर निवडणूक शांततेच होईल का ? निवडणूक आयोगाने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे आणि कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांना आदेश दिला पाहिजे !

कालीमाते, जगाला कोरोनाच्या संकटापासून मुक्त कर !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बांगलादेशातील ५१ शक्तीपिठांपैकी एक असलेल्या जेशोरेश्‍वरी काली मंदिरात प्रार्थना ! ‘कालीमाते, जगाला कोरोनाच्या संकटापासून मुक्त कर.’ मला संधी मिळाली, तर मी या ५१ शक्तीपिठांमध्ये जाऊन डोके टेकवेन.

भारत घुसखोरांची राजधानी नाही !  

भारत जगातील घुसखोरांची राजधानी नाही. तसे आम्ही होऊ देणार नाही. सरकार कायद्यानुसार आपले काम करत आहे, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात नमूद केले.

केरळमध्ये मागील ५ वर्षांत ६५ सहस्र कोटी रुपयांची मद्यविक्री !

केरळमधील जनतेला मद्यपी बनवण्याचा घाट घालणारे जनताद्रोही साम्यवादी सरकार ! महसुलाच्या हव्यासापायी जनतेच्या आरोग्याशी खेळणारे साम्यवादी सरकार जनहित काय साधणार ?

दाणोली येथील प.पू. साटम महाराजांचा पुण्यतिथी उत्सव साधेपणाने साजरा होणार

प.पू. साटम महाराज सोहळ्याला भाविकांनी गर्दी न करता ज्या ठिकाणी असाल तेथूनच श्री समर्थ साटम महाराज यांना नमस्कार करावा

३१ मार्चला शिवजयंतीदिनी कळंगुटपर्यंत मिरवणूक नेणारच ! – शिवप्रेमींचा निर्धार

मिरवणुकीसाठी शासनाची अनुमती मिळाली नसली, तरी मिरवणूक काढणारच, असे शिवप्रेमींनी ठरवले आहे.

सर्व व्यापारी, दुकानदार आणि व्यावसायिक यांनी स्वतःची कोरोनाविषयक चाचणी करून घ्यावी ! – जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात कोरोनाचे नवीन २८ रुग्ण