बाटलीबंद पाणी विक्रीसाठी भारतीय मानक ब्युरोचे प्रमाणपत्र आवश्यक ! – भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा नवा नियम

नवी देहली – भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (‘एफ्.एस्.एस्.ए.आय.आय.’ने) बाटलीबंद पाणी आणि मिनरल पाणी उत्पादकांसाठी भारतीय मानक ब्युरोचे (बी.आय.एस्.’चे) प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. १ एप्रिल २०२१ पासून हा नियम लागू होणार आहे.

या प्रमाणपत्रानंतरच अशा प्रकारे पाणी विकता येणार आहे. अन्न सुरक्षा आणि मानक कायदा २००८ नुसार सर्व खाद्य व्यवसाय संचालकांना कोणताही खाद्य व्यवसाय प्रारंभ करण्यापूर्वी परवाना / नोंदणी घेणे बंधनकारक असणार आहे. यापूर्वी वर्ष २०१९ मध्ये रेल्वे स्थानकांवरील अनेक स्टॉल्समध्ये अनधिकृत ब्रँडच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची विक्री समोर आली होती.